भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा खामगाव येथे जंगी सत्कार करण्यात आला. तसेच या कार्यक्रमात बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या ध्येय धोरणाविषयी माहिती देत आगामी लोकसभेचा उमेदवार हा भाजपचा असेल असे आश्वासन दिले. तसेच या कार्यक्रमांमध्ये जळगाव जामोद येथील काँग्रेसचे माजी नगरसेवक नितीन ढगे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ संजय कुटे, विदर्भ संघटन महामंत्री डॉक्टर उपेंद्र कोठेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष आकाश फुंडकर, डॉक्टर रणजीत पाटील, माजी आमदार चैनसुख संचेती, आमदार श्वेता महाले, माजी आमदार विजयराज शिंदे, माजी आमदार तोताराम कायंदे, धृपतराव सावळे, जिल्हा महामंत्री योगेंद्र गोडे, यांच्या उपस्थित भाजपामध्ये प्रवेश घेतला. यावेळी मोहन शर्मा नंदकिशोर अग्रवाल,डॉ गणेश माटे, संतोष देशमुख यासह जिल्हाभरातील पदाधिकारी तालुका अध्यक्ष विविध आघाड्यांचे पदाधिकारी मंडळ अध्यक्ष यांच्यासह जिल्हाभरातील कार्यकर्ते या सत्कार सोहळ्याला उपस्थित होते.
नवनियुक्त भाजप प्रदेश अध्यक्ष यांचे खामगावात जंगी स्वागत या कार्यक्रमात माजी नगरसेवक नितीन ढगे यांनी घेतला भाजपात प्रवेश...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:-
