जळगांव जामोद तालुक्यातील ग्राम टाकळी खाती येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांची १०२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, कार्यक्रमाच्या सुरुवातीला साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील जेष्ठ नागरिक नामदेवराव भालेराव हे होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी बोलताना भारतीय बौद्ध महासभेचे भिमराव तायडे यांनी लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जिवनचरीत्रावर सखोल असे मार्गदर्शन केले व आजची समाजाची दिशाआणि दशा यावर सखोल असे मार्गदर्शन केले यावेळी वंचित बहुजन आघाडी चे अध्यक्ष संतोष गवई, तालुका उपाध्यक्ष सुनिलभाऊ बोदडे, मातंग समाजाचे नेते बबनराव बोदडे, प्रल्हाद कांबळे, कैलास चंदनशिव, वामन गुळेकर, महादेव अडाळे ,व सामाजिक कार्यकर्ते प्रा,ढोले सर यांनी सुद्धा मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला मातंग समाज समन्वय समिती चे अध्यक्ष संजय बोदडे,विजय सोनोने,लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष कैलास डाखोरे, महासचिव महादेव खरात, ता. उपा अध्यक्ष दिपक रणशिंगे, विलास बोरले,भारत पाटोळे , वंचित चे आजम कुरेशी, तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कोकाटे,पि.डि सरदार,अमोल तायडे, प्रशांत अवसरमोल, निलेश वानखडे, सुनिल सोनोने, कमलाबाई अंजनकार, यांची उपस्थिती होती तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वासुदेव रनशिंगे,यौगेश भालेराव,उमेश पाटोळे ,शंकर रनशिंगे, जगलुमंन निकाळजे, साहेबराव खरात, ज्ञानेश्वर रनशिंगे, मधुकर रनशिंगे तथा लहुजी शक्ती सेनेचे कार्यकर्ते यांनी प्रयत्न केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव खरात तर आभार ग्रामपंचायत सदस्य प्रशांत अवसरमोल यांनी केले.
लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची जयंती टाकळी खाती येथे उत्साहात साजरी...
जळगांव जामोद प्रतिनिधी:-
