गेल्या मार्च महिन्या पासून वर्ल्ड व्हिजन इंडिया मेळघाट शाखा चिखलदरा तालुक्यातील ३१ आदिवासी गावांमध्ये औपचारिक शिक्षण वर्ग घेण्याचा उपक्रम राबवित आहे या औपचारिक शिक्षण मध्ये मुलांना अधिक रस यावा याकरिता मागील काही दिवसात वर्ल्ड व्हिजन इंडिया मेळघाट शाखा या संस्थेने या औपचारिक शिक्षण वर्गाला विविध शेक्षणिक साहित्य जसे ब्लँक बोर्ड (फळा) व स्टॅन्ड , मुडाक्षरे ओडखण्याचे चार्ट, प्राणी व फुलझाडे ओळखण्याचे चार्ट, गणिताचे विविध चार्ट्स,मुलांसाठी वर्क बुक, शिक्षकांसाठी वर्क बुक, चटई, पेटी आणि आता ९१ पुस्तकांचे ग्रंथालय देऊन त्यांचा उत्साह विढविण्याचे काम करत आहे. या सर्व शैक्षणिक साहित्याच्या उदघाटन माननीय आमदार श्री.राजकुमार पटेल साहेबांच्या शुभ हस्ते करण्यात आले. श्री.जगत शनवरे यांच्यासह श्री. प्रवीण तेलगोटे हे देखील यावेळी उपस्थित होते. वर्ल्ड विजन टीम प्रलोभ इंगळे, अरुण गवई, अश्विन एक्का,राजेश पवार, राहुल प्रकाश, अजय चावंडे, दिलीप चावंडे, कुलदीप हरसुले, शिवपाल ठाकुर, आणि अभिषेक पात्रे या लोकांनी योजनेला यशस्वीरित्या लागू करण्यासाठी कठोर प्रयत्न केले.
आमदारांनी केले औपचारिक शिक्षण घेत असलेल्या मुलांकरिता मिनी ग्रंथालयाचे अनावरण...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
