मेलघाटातील आदिवासी बांधव वनविभागा विरूद्ध आक्रमक....दिला वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालयाला ताला ठोकण्याचा इशारा...


राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी..

पेसा क्षेत्रतील आदिवासी बांधवाना व स्थानिकांना शाशनाने मोठ्या प्रमाणात अधिकार दिले आहेत. मात्र वनविभाग मनमानी कारभार करीत असून आदिवासी बांधवांचा अज्ञानाचा फायदा घेऊन  त्यांची पिळवणूक करित असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.हतरू परिसरातील  आदिवासी बांधव व इतर नागरिकांचा विविध मागण्या असून जल, जंगल,जमीन यावर आमचा अधिकार असूनही आम्हाला मासेमारी ,जनावरांना पाणी पिणे ,जंगलातून जलन फाटा आणणे यासाठी मनाई केली जाते.शासनाने आम्हाला वन अधिकार कायद्याने आम्हाला जंगल दिले आहे,त्यावर ही आम्हाला काहीच काम करू दिले जात नाही. पेसा कायदा 2006 अंतर्गत लागू असून सुद्धा आम्हाला रेती,नदीतील दगड,,विटा बनविण्यासाठी परवानगी दिली जात नाही.शामा प्रसाद मुखर्जी सारख्या योजना मधून आम्हाला विश्वासात न घेता तो निधी कुठे खर्च होतो ,त्या विषयी पण आम्हाला माहिती दिली जात नाही.दळणवळण करण्यासाठी रस्ते बनवू देत नाही,सामूहिक वनहक्क कायद्याने आम्हाला जे जंगल मागितले होते ते न देता दुसरेच जंगल आम्हाला देऊन आमच्यावर अन्याय करत आहे. जंगल मधील असणारे आमचे देवी, देवता त्याची पूजा आम्हाला करू देत नाही , मेळघाटातील आदिवासी गावाची पुनर्वसन प्रथा बंद करावी ,शाशनाकडून घरकुल योजना मिळते पण त्या बांधकामासाठी रेती,विटा,माती लागतात पण वनविभाग कडून आमच्यावर गुन्हे दाखल करतात ,मग आम्ही घर कसे बांधणार असे विविध समस्या घेऊन हतरू परीक्षेत्रातील आदिवासी नागरिकांनी प्रकल्प कार्यालय आदिवासी विकास कार्यालय धारणी येथील उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. या सर्व मागण्या पूर्ण न झाल्यास 25/08/2022 रोजी दुपारी 1वाजता वनपीक्षेत्र कार्यालय हतरू ला ताला ठोको आंदोलन करण्याचा इशारा हतरू परिसरातील आदिवासी नागरिकांनी आपल्या निवेदना द्वारे दिला आहे .आणी या दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास वनविभाग व प्रशासन जवाबदार राहील याची नोंद घ्यावी असेही या निवेदनात म्हटले आहे. यासह प्रतिलिपी मध्ये मुख्य वनसंरक्षण वनक्षेत्र संचालक  व्याघ्रप्रकल्प अमरावती,मा.विभागीय आयुक्त अमरावती, मा.जिल्हाधिकारी अमरावती, मा.उपायुक्त आदिवासी विकास विभाग अमरावती, मा. ठानेदार साहेब पोलिस स्टेशन चिखलदरा ,  मा.तहसीलदार कार्यालय चिखलदरा आदिंना दिले.

Previous Post Next Post