हिवरखेडच्या पोळ्याच्या बाजाराला आलं यात्रेचं स्वरूप,आठवडी बाजार हा वर्षातून दोनदा होतो , स्थलांतर,पोळ्या निमित्ताने एकदा सदाशिव संस्थानवर तर दुसऱ्यानंदा महाशिवरात्री निमित्त देवळी वेस,


 हिवरखेड प्रतिनिधी/प्रशांत भोपळे,

हिवरखेड येथे प्रत्येक आठवड्याला  म्हणजे प्रत्येक सोमवारला हा आठवडी बाजार नेहमी भरतो,पाणी पाऊस,वार उदान तिकडे  काहीही असो पण इकडे आठवडी बाजार नेहमी भरतो  गावकऱ्यांनसह खेड्यापाड्यातिल ग्राहकवर्ग बाजारात खरेदी विक्रीचा लाभ घेतात, हा आठवडी बाजार वर्षातून दोनदा त्याच्या जागेवरून स्थलांतर केला जातो, महादेवाचे असलेले निवास गावातील  सदाशिव संस्थान व देवळी वेस महादेव मंदिर येथे हा वर्षातून दोन वेळा आठवडी बाजार भरतो आणि दोन्ही वेळा या बाजाराला यात्रेचे स्वरूप येते,बाजाराला येणारे प्रवाशी महादेवाच्या दर्शनासह बाजारातील विविध आकर्षक  ,लाभदायक विक्री करिता आलेल्या वस्तू खरेदी करून बाजाराचा लाभ घेतात,  तसेच कित्येक वर्षांपासून बाजार स्थलांतर होण्याची ही रीत कायम असून मोठ्या संख्याने ग्राहक,व्यापारी बाजारात येतात, या बाजाराचे एक विशिष्ट म्हणजे हे दोन्ही बाजार मोठ्या सण उत्सवालाच भरतात, हा बाजार कोरोना काळामुळे गेल्या दोन वर्षे भरू शकला नाही यंदा मोठ्या संख्येने भरला,भारतात संध्या महागाईमुळे नागरिकांनवर बहुतेक मंदी आली असणार पण जे रीती रिवाज परंपरा आहेत त्या मात्र साजऱ्या कराव्याच लागतात, महाराष्ट्र सर्व धार्मिक सण उत्सव पारंपरिक पद्धतीने नागरिक या महागाईत तळजोड करून साजरे करतातच हे या बाजारावरून दिसून येते,

Previous Post Next Post