----------------------------------------
मेलघाटतील शिक्षणाचा स्तर एकदमच खाली घसरला आणी आदिवासी विद्यार्थांचा शिक्षणाचा तीन तेरा वाजल्याचे उदाहरण शुक्रवार बघायला मिळाले.काकरमल येथील जिल्हा परिषद शाळेच्या पृथ्वीराज नेतराम चव्हाण या शिक्षकाने मद्यधुंद व्यवस्थेत टेबलावर पाय पसरून झोप काढली व तसेच पॅन्टमध्ये लघवी केल्याचे ग्रामस्थांना आढळले.प्रशासन आणी सरकारच्या नजरेत ही अतिशय लाजस्पद बाब आहे .मात्र स्थानिक नागरिक व विध्यार्थांसाठी ही नेहमीची दररोजची बाब आहे.त्यामुळे हा दारुडा शिक्षक आम्हाला नको असे म्हणत विद्यार्थी व पालकांनी चक्क पंचायत समिती पुढे ठिय्या आंदोलन केले.शुक्रवारी शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थी व पालकांनी या संपूर्ण घटनाक्रमाचे चित्रीकरण करून गटविकास अधिकारी महेश पाटील यांच्या समोर मांडले.शनिवारी पंचायत समिती ला सर्व विध्यार्थानी "गटविकास अधिकारी साहेब, आम्हाला हा दारुडा शिक्षक नको" असे या विध्यार्थांनी ठणकावून सांगितले व दुपारपर्यंत शिक्षकाला हातावर निलंबानाचा आदेश मिळाला.मात्र मेळघाटच्या आदिवासी विद्यार्थांचा होत असलेल्या शिक्षणाचा भरपाई कशी होणार हा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे .जिल्हा परिषद द्वारा जेव्हा शिक्षकाची बदली प्रक्रिया राबविण्यात येते,त्यावेळी अधिकांश शिक्षक मेळघाटात येण्यासाठी तालमटोल करतात तर काही शिक्षक उत्सुक असतात.मेळघाट मध्ये शिक्षक आपले मर्जीचे मालक,मुख्यालयी राहणे एकही शिक्षक पसंद करत नाही.अप डाऊन करणारे शिक्षक आठवड्यातून दोन ते तीन दिवस आपला चेहरा शाळेत दाखवितात,विद्यार्थांचा शिक्षकांचा व भविष्याचा त्यांना काही घेणंदेणं नाही .अर्थातच मेळघाटातील विद्यार्थी शिक्षणाने मागे पडण्याचे मुख्य कारण म्हणजे असे दारुडे शिक्षक व इमानदारी ने आपले कर्तव्य न बजावता घरी मस्त AC मध्ये झोपा काढणे.
---प्रतिक्रिया---
काकरमल येथील दारुडा पृथ्वीराज चव्हाण या शिक्षकाचे कृत्य प्रशासनाची प्रतिमा मलीन करणारे आहे.जिल्हा सेवा (वर्तणूक )नियम १९६७ चे कलम 3 भंग केल्याचे या घटना क्रमातून सिद्ध झाले आहे .त्यामुळे त्यांचा निलंबनाचे आदेश बिडीओ साहेब यांनी काढले आहे*
संतोष जोशी- प्रभारी सीईओ
जिल्हा परिषद,अमरावती
