ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सामूहिक राष्ट्रगीत गायन...


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त दिनांक 17 ऑगस्ट रोजी जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये सकाळी 11 वाजता सामूहिक राष्ट्रगीत म्हणण्यात आले. सदर सामूहिक राष्ट्रीय गायनाचे संचालन ग्रामीण रुग्णालय येथील सुरक्षारक्षक वैभव वाघमारे यांनी केले. यावेळी ग्रामीण रुग्णालयातील उपचाराकरिता आलेले रुग्ण तसेच रुग्णालयातील डॉक्टर पटेल, डॉक्टर केदार,डॉ.बोंबटकार, लांडे,तायडे,जैन, परिचारिका डाबेराव, दिपाली मुलनकर,दिपा तेजकर,देशमुख, टेकाडे,स्वाती लधाडे,मोहन पवार, मनिषा ठेंग,स्वाती घट्टे,स्नेहल भगत,पत्रकार अनिल भगत, ॲम्बुलन्स चालक राजू बुटे यांच्यासह विविध शाळेचे विद्यार्थी तसेच गावातील नागरी यांची सामूहिक राष्ट्रगीत गायनाला उपस्थिती होती. राष्ट्रगीत गायनासाठी ग्रामीण रुग्णालयाचा संपूर्ण परिसर स्तब्ध झाला होता. राष्ट्रगीत गायन झाल्यानंतर संपूर्ण रुग्णालयाचा परिसर भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणांना दुमदुमन गेला होता...

Previous Post Next Post