दिनांक 18/8/22 रोजी हिवरखेड येथील अतिश मदनलाल बजाज हे खाजगी कामाकरिता अकोला येथे जात असताना अकोट बस स्थानक येथे त्यांची पैसे असलेली बॅग चुकून राहिली. यावेळी सैनिक पुरुषोत्तम ढगे क्रमांक 505 हे कर्तव्यावर हजर होते यांच्या निदर्शनास सदर बॅग आल्याने त्यांनी ती बॅग आकोट पोलीस स्टेशन येथे जमा केली. बॅग मधील कॉन्टॅक्ट नंबर वरून आतिश बजाज यांच्याशी संपर्क करून त्यांना ती बॅग परत देण्यात आली यामुळे आजही माणुसकी जिवंत असल्याचे हे जिवंत उदाहरण आहे.हिवरखेड येथील व्यापारी आतिश मदनलाल बजाज हे अकोट येथील बस स्थानकावर आपली बॅग विसरले व निघून गेले ती बॅग तेथे दुपारी चार वाजल्यापासून तेथे होती त्यानंतर सैनिक पुरुषोत्तम ढगे यांना ती बॅग दिसून आली आणि त्यांनी ती बॅग अकोट शहर पोलीस स्टेशन ला जमा केली व त्या बॅगमधील त्यांच्या कॉन्टॅक्ट नंबर घेऊन त्यांच्याशी कॉन्टॅक्ट साधला व त्यांना त्यांची बॅग व त्यामधील रोख रक्कम नऊ हजार तीनशे रुपये त्यांना परत दिली.अकोट शहर पोलीस स्टेशन चे पी आय अहिरे साहेब व पीएसआय धर्मे साहेब व तालुका समादेशक नाठे साहेब यांच्या हस्ते ती बॅग बजाज यांना परत देण्यात आली . ढगे यांच्या या प्रामाणिकतेमुळे त्यांचे आतिश बजाज यांनी आभार मानले.
पुरुषोत्तम ढगे यांचा प्रामाणिकपणा , मिळालेली बॅग केली परत....
हिवरखेड प्रतिनिधी/प्रशात भोपळे..
