व्यापारी संघटनेतर्फे आयोजित मॅरेथॉन स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आग्र्याचा आसिफ खान ठरला विजेता...


 जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी:-

भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत वर्षानिमित्त व मेजर ध्यानचंद  यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा होणाऱ्या राष्ट्रीय खेळ दिवसाचे औचित्य साधत मी धावतो देशासाठी... देशाच्या अखंडतेसाठी व एकात्मतेसाठी या संकल्पनेनुसार येथील व्यापारी संघटनेच्या वतीने भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती . या स्पर्धेचा प्रवेश अर्ज गुगलवर ऑनलाईन असल्याने विनाशुल्क ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.यामध्ये नागपूर ,नासिक ,अकोला,संभाजीनगर,उत्तर प्रदेश, छत्तीसगड, जळगाव खान्देश अशा विविध ठिकाणच्या 212 स्पर्धकांनी भाग घेतला. ही स्पर्धा पाच किलोमीटरची होती. या स्पर्धेचे प्रथम बक्षीस रुपये 5555, द्वितीय 4444, तृतीय 3333, चतुर्थ बक्षीस 2222, व पाचवे बक्षीस 1111 तसेच उत्तेजनार्थ 500 रोख बक्षीस असून त्यासोबत सर्व विजेत्या स्पर्धकांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र बक्षीस देण्यात आले. ही बक्षिसांची रक्कम व्यापारी संघटनेच्या सदस्यांच्या प्रतिष्ठानच्या नावाने होती तर यासाठी लागणारा खर्च व्यापारी बंधूंनी स्वतःच्या संघटनेने देणगीदारांच्या वतीने खर्चाचा भार उचलला. या स्पर्धेचे पंच म्हणून प्रविण डाबरे सर, प्रमोद येऊल , दिपक देशमुख , राऊत यांनी काम पाहिले . स्पर्धेत बक्षीस घेतलेले स्पर्धक प्रथम आसिफ खान राहणार आग्रा हा स्पर्धक सर्वात कमी वेळात म्हणजे फक्त बारा मिनिट 46 सेकंदात अंतर पार करून प्रथम आला.त्याला 5555 व स्मृतीचिन्ह , द्वितीय क्रमांक भूपेंद्रसिंह , नाशिक  4444 रू रोख व स्मृतीचिन्ह ,तृतीय बक्षीस सुनील कुमार राहणार नाशिक 3333 रोख व स्मृतिचिन्ह, चौथे बक्षीस प्रदीप दलासिंह राजपूत राहणार संभाजीनगर रोख 2222 व स्मृतिचिन्ह पाचवे बक्षीस दीपक सोमवाणी राहणार दिपनगर अकोला 1111 रुपये व स्मृतिचिन्ह अशी बक्षिसे प्देण्यात आले. तर यामध्ये झोपे सर हे सेवानिवृत्त  शिक्षकाने स्पर्धेत भाग घेतल्याने सर्वात वयस्कर स्पर्धक म्हणून प्रोत्साहन पर रोख पाचशे रुपये, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले.शो मॕच ठरली आकर्षणाचा केंद्र बिंदू या स्पर्धेआधी शहरातील मुख्य मार्गावरून हातात तिरंगा घेऊन सर्व व्यापारी संघटनेचे सदस्य तसेच गावातील नागरीक धावले व मी धावतो देशासाठी... देशाच्या एकात्मतेसाठी व अखंडतेसाठी ही संकल्पना सार्थ ठरवली. मॅरेथॉनला ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी हिरवी झेंडी दाखवली.तर बक्षीस वितरण समयी व्यापारी संघटनेच्या वतीने देणगी दात्यांचे सत्कार करण्यात आले .ठाणेदार सुनिल अंबुलकर यांनी स्पर्धकांमध्ये आपल्या ओजस्वी वाणीने स्फूर्तीदायक वक्तव्य करून नियोजनाबद्दल संघटनेचे कौतुक केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी व्यापारी संघटनेच्या पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

Previous Post Next Post