जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा येथे गोकुळाष्टमीनिमित्त आयोजित दहीहंडी व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा समिती अध्यक्ष सुनील खवले हे होते.जिल्हा परिषद शाळेमधील बालगोपालांनी कृष्ण आणि राधा यासह गवळणींची वेशभूषा परिधान करून दहीहंडी उत्सहात सहभाग घेतला. तसेच या कार्यक्रमांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाही संपन्न झाले. यामध्ये जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी नृत्यासह गायनही केले. यावेळी जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत मनसोक्त दांडिया केला. यावेळी चालठाना येथील आदिवासी विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्यासह टिपरी नृत्य केले. सदर कार्यक्रम यशस्वीते करिता शाळेचे मुख्याध्यापक ताडे सर, अस्मिता क्षिरसागर, संदीप सारोकार, राखोंडे सर, बुटे सर, बोंबटकर मॅडम, गवई मॅडम, राजगुरे मॅडम यांच्यासह शाळेच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह गावातील नागरिक माता व पालक यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा सुनगाव येथे दहीहंडी उत्सव साजरा...
जळगांव जा.प्रतिनिधी:-
