भारत जोडो पदयात्रेचे जळगांव जामोद विधानसभा मतदार संघात गावोगावी जंगी स्वागत...काँग्रेसच्या इतिहासा शिवाय देशाचा इतिहास पुर्ण होऊ शकते नाही... --डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर...


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

भारत जोडो पदयात्रेच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने देशपातळीवर जनजागृती करीत साजरा करण्यात आला. जळगांव जामोद मतदार संघातील या पदयात्रेची सुरूवात श्री.गजानन महाराज यांची पावन भुमी शेगांव शहरातुन ढोल ताशांच्या निनादात या पदयात्रेचे शहरातील ठिकाणी ठिकाणी ओवळून व फुलांचा वर्षाव करीत जंगी स्वागत करण्यात आले. या भारत जोडो पदयात्रेत मतदार संघातील शेकडो काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते व महीला खांद्यावर ध्वज घेऊन स्वयंस्फूर्तीने सहभागी होत होते. देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांच्या आहुत्या दिल्या असून काँग्रेसच्या इतिहासा शिवाय देशाचा इतिहास पुर्ण होवुच नसल्याचे प्रतिपादन जळगांव जामोद मतदार संघाच्या पक्षनेत्या डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर यांनी पदयात्रे दरम्यान नागरिकांनी संवाद साधुन जनजागृतीतुन केले.अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने 9 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट पर्यंत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी  वर्षात देशपातळीवर पदयात्रा काढत आहे.या पदयात्रेच्या माध्यमातून स्वतंत्र प्राप्तीनंतर काँग्रेसने केलेले कार्य तसेच स्वातंत्र्य प्राप्ती करीता काँग्रेस जणांनी दिलेले बलिदान या प्रती कृतज्ञता व्यक्त करीत जनजागृती करण्यात येत आहे. या भारत जोडो पदयात्रेचा जळगांव जामोद विधानसभा मतदार संघातील शेगांव शहरातील शिवाजी चौक येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शुभारंभ 12 ऑगस्ट रोजी करण्यात आला व शेगांव शहरातुन भव्य पदयात्रा काढण्यात आली. यावेळी कांग्रेस चे खामगांव चे पक्षनेते ज्ञानेश्वर दादा पाटील, ज्येष्ठ काँग्रेसचे ते दयाराम वानखडे, शेगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष शैलेंद्र दादा पाटील, माजी नगराध्यक्ष शिवाजीराव बुरूंगले, माजी नगराध्यक्ष शारदाताई कलोरे, जिल्हा सरचिटणीस कैलास देशमुख, शेगाव शहराध्यक्ष किरण बापू देशमुख, शेगाव तालुकाध्यक्ष विजुभाऊ काटोले, ज्येष्ठ काँग्रेसचे बुढन जमादार, जयंतराव खेडकर, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ.असलम खान, नगरसेवक प्रफुल ठाकरे, हाशमभाई, केशवराव हिंगणे, दिलीप पटोकार, पवनभाउ पचरेवाल, लक्ष्मण भाऊ गवई, फिरोज भाउ, ज्ञानेश्वर शेजोले, संतोष पाटील, हैदर अली, महिलांचे शहराध्यक्ष सविता ताई झाडोकार, कविता राजवैद्य, सलीम मेंबर,अनिल सावले,चंद्रकांत माने, जब्बार अली, विजुभाऊ वानखडे, गोपाल कलोरे,भिकू सारवान, वसंत शर्मा, डॉ. सखाराम वानखेडे, संतोष माने, सुनील टिबडेवाल,मुन्ना सोंडकर, काका सोलनकर, नंदकिशोर वाघ, सुभाष शेगोकार,डि.के.शेगोकार प्रकाश शेगोकार, राजू पारखेडे, गुणवंत मोरे, कैलास खारोडे, गोपाल पैठणकर, शिवा धनोकार इत्यादी उपस्थित होते.दुपारनंतर वरवट बकाल कडे मार्गस्थ झाली. त्यानंतर भारत जोडो पदयात्रा ही कालखेड, भोनगांव,मनसगांव, खिरोडा, पातुर्डा, वानखेड इत्यादी गावांमध्ये भारत जोडो पदयात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले.पदयात्रेचा दुसरा दिवस वरवट बकाल येथे आदिवासी नृत्य व देशभक्तीपर गीत व नारे यांच्या जयघोषात सुरुवात करण्यात आली. दुसऱ्या दिवशी वरवट संग्रामपुर निवाना ही गावी घेत पदयात्रा पुढे जळगावकडे मार्गस्थ झाली.यावेळी पदयात्रेसोबत तेजीरावजी मारोडे, वा.रा.पिसे प्रकाशबापू देशमुख, तालुकाध्यक्ष राजूभाऊ वानखेडे, मनोहर बोराखडे, संतोषभाऊ राजनकर, जि.प. सदस्या मीनाक्षी हागे, राजेश्वर बापू देशमुख, संजय ढगे, शेख अफरोज,  सरपंच प्रतिभाताई इंगळे, हरिभाऊ राजनकर, अभय मारोडे, झहीर अली, अमोल घोडेस्वार, पठाण सर,आबिद सुरत्ने, साजिद पठाण शिवकुमार गिरी,सुरेखा पळसकर,वरवट सरपंच इंगळे ताई, संजय वाकोडे सतीष टाकळकर, संतोष टाकळकर शामभाऊ डाबरे, राजू राठोड मोहन रौंदले सर, श्रीकृष्ण दातार, आनंद मानखैर, गजानन पाटील, सै.आसिफ संतोष म्हसाळ, गणेश वानखेडे, गोपाल इंगळे,प्रमोद गढे, नितीन राऊत, शांताराम म्हसाळ,अरूण वानखेडे, संतोष बाजोड, समाधान बगाडे, गजानन रहाटे, धर्मेंद्र इंगळे, रमेश लोणकर,अजय अग्रवाल, जगन्नाथ विश्वकर्मा, शंकर विश्वकर्मा,सुरेश भाऊ हागे, बालु धुळे, हुसेन पालकर निलेश भाऊ चांडक, पठाण सर, नकलसिंग, गजानन ढोकणे डॉ. झाडोकार, मुन्ना ठेकेदार, मनोज पालीवाल, संतोष येनकर,नरेंद्र देशमुख,अमित रंगभाल,शे.समीर, रमेश पाखरे, रमेश कोष्टी इ उपस्थित होते.भारत जोडो पदयात्रेची 14 ऑगस्ट तिसऱ्या दिवशी ग्राम चांगेफळ व खेर्डा बु या गांवात पारंपारिक लेझीम पथक सादर करून भारत जोडो पदयात्रेची भव्य अशी मिरवणूक गावात काढून पदयात्रा ही जळगांव शहरात कडे मार्गस्थ झाली.जळगांव जामोद शहरातुन यावेळी भव्य पदयात्रा काढण्यात आली. यामध्ये अनेक मुलांनी भारत देशासाठी बलिदान देणाऱ्या महापुरुषांच्या वेशभूषा सादर करून, आदिवासी नृत्या सोबत, देशभक्ति पर नारे देत पुर्ण शहरात भर पावसात भिजून भारत जोडो पदयात्रेची भव्य पदयात्रा काढली.या पदयात्रेचा समारोप दुर्गा चौकात करण्यात आला. यावेळी समरोपिय कार्यक्रमात काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष विजुभाऊ अंभोरे मा. आमदार कृष्णराव इंगळे, मा. जिल्हाध्यक्ष लक्ष्मणरावजी घुमरे, मा.जि.प.अध्यक्ष प्रकाश पाटील, महिलांच्या प्रदेश प्रतिनिधी ज्योतीताई ढोकणे, तालुकाध्यक्ष अविनाश उमरकर, शहराध्यक्ष अर्जुन घोलप, जिल्हा सरचिटणीस अच्छेखाजी, महिलांच्या शहराध्यक्ष मीनाताई सातव, नगरसेवक श्रीकृष्ण केदार, चित्राताई इंगळे, संदीप मानकर, कलीम मिस्त्री, निशिकांत देशमुख, आसिफ भाई,प्रवीणभाऊ भोपळे राजुभाऊ घुटे ,विनोद धंदर, एजाज शहा,अमर पाचपोर, समाधान दामधर, वसंत धुरडे, विजय हिस्सल, सलामखा, किसना दामोदर, सुनील येनकर, प्रमोद तितरे, गजानन साबले, शे. राजिक, जुबेर सहारा, सलीम शाहा, शेख जुनेद अमोल मानकर ओ.पी.तायडे, अन्सार बाबु,अकील शहा, वसंत बोदडे, सुनील काकड़े, ज्ञानेश्वर वानखडे, विश्वंभर वावगे, राजुभाऊ शीत्रे, सुनील वानखडे, गजानन पुंडे, गजानन राजपुत,प्रकाश साबे, ज्ञानेश्वर राजनकर, प्रभुदास बंबटकार, वसंता जाधव, अनिल इंगळे,बाळुभाऊ इंगळे, पांडुरंग भोपळे, मधुकर वानखडे,यावेळी भारत जोडो पदयात्रेत गावागावांतुन प्रचंड प्रतिसाद मिळाला असुन पदयात्रेकरूचा उत्साह गावोगावी गावकरी व नागरीकाकडुन मिळणाऱ्या प्रतिसादामुळे व्दिगुणित झाला व संपुर्ण मतदार संघ तिरंगामय झाल्याचे दिसून आले.समारोपिय कार्यक्रमात विजय अंभोरे यांनी कांग्रेस ची बलिदानाची परंपरा आहे ती कोणीही नाकारू शकत नाही असे सांगीतले तर यावेळी लक्षणराव घुमरे, स्वातीताई वाकेकर, प्रकाश पाटिल, ज्योतीताई ढोकने यांची समयोचित भाषणे झाली. यावेळी भारत जोड़ो पदयात्रेत तिनही दिवस डॉ सौ स्वाती ताईं वाकेकर यांच्या समवेत पदयात्रा करणाऱ्या दिलीप पटोकार, निशिकांत देशमुख,आसिफ इकबाल, संजय वाकड़े, नितिन जाधव यांचा सत्कार करण्यात आला.संचालन अविनाश उमरकर तर आभार राजीव घुटे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली  सदर भारत जोडो पदयात्रे दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, प्रदेश पदाधिकारी,आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, ब्लँक अध्यक्ष, शहर अध्यक्ष, आघाडी संघटना सेल व विभाग, महीला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल व सर्व फंटल सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते, गावोगावीचे सरपंच, सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने खांद्यावर तिरंगा ध्वज घेऊन सहभागी झाले...

Previous Post Next Post