जळगांव जा.प्रतिनिधी:-
सेवा पंधरवाड्या अंतर्गत गरीब कल्याणचे प्रणेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त दिनांक 26 सप्टेम्बर रोजी जळगाव जामोद मतदारसंघातील दिव्यांग बंधुना आवश्यक अश्या साहित्याचे मोफत वितरण विभागचे आमदार डॉ संजय कुटे यांच्या हस्ते करण्यात आले. स्थानिक श्री कोटेक्स सुनगांव रोड येथे भारतीय जनता पार्टी व श्रीराम कुटे गुरूजी चैरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने सेवा पंधरवाड़ा अंतर्गत या कार्यक्रमचे आयोजन केले होते. गोर गरीब जनतेला शासकीय योजनाँचा लाभ मिळून त्यांचे जीवन मान ऊंचावले जावे या करीता मोदीजिंची संकल्पना पूर्ण करण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे मानोगत डॉ संजय कुटे यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी 33 तीन चाकी साईकल, 100 काठया, 24 कर्णयंत्र, 30 कुबड्या, 30 व्हील चेयर व इतर साहित्य दिव्यांग बंधुना वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमला 200 पेक्षा जास्त दिव्यांग बांधवांची उपस्थिति होती. गरजवंत दिव्यांग बांधवाना आवश्यक असे साहित्य मिळाल्याने चेहर्यावर समधान दिसत होते. या प्रसंगी श्री महिला बालकल्याण व अपंग पूनर्वसन मंडळ धुळे या संस्थाचे मोलाचे सहकार्य या कार्यक्रमास लाभले होते. या प्रसंगी सौ अपर्णाताई कुटे, माजी नागराध्यक्ष सौ सीमाताई डोबे, डॉ यास्मीन चौधरी, सौ अंजली ताई बावीस्कर, अम्बादास निम्बालकर,कैलास पाटिल, भगतसिंह चौव्हान, रविंद्र कुटे, माजी जी प सदस्य बंडू पाटिल, माजी सभापति रामेश्वर राऊत, राजेंद्र गांधी, राजेंद्र ठाकरे, संग्रामपुर तालुकाध्यक्ष लोकेश राठी, रितेश आव्हेकर, गणेश अरुड़कर यांचे सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.