प्रेस क्लबच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद...२२३ रुग्णांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ...


 प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी...

स्थानिक प्रेस क्लब,संवाद परिवार व गोदावरी फौंडेशन जळगावच्या संयुक्त विद्यमाने स्व.कमलिनीताई सहदेवराव भोपळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सहदेवराव भोपळे विद्यालयात भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात २२३ रुग्णांनी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय जळगावच्या तज्ञ डॉक्टरांच्या सेवेचा लाभ घेतला.केवळ २० रु.नोंदणी शुल्क घेऊन रुग्णांची तपासणी करण्यात येऊन त्यांना ईसीजी व टू डी इको देण्यात आला.नाक,कान, घसा तज्ञ, नेत्र तज्ञ,स्त्री रोग तज्ञ,हर्निया,मूळव्याध, मुतखडा,अस्थीरोग इ.सर्व  तज्ञांनी रुग्णांची तपासणी केली व यातील २७ रुग्णांची शस्त्रक्रिया वा इतर तपासणीसाठी शिफारस करण्यात आली. या सर्व रुग्णांना जळगावला मोफत उपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत.मान्यवरांच्या हस्ते स्व.कमलिनीताई भोपळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिलकुमार भोपळे होते तर सत्यदेव गिऱ्हे,ठाणेदार विजय चव्हाण,डॉ.महेश देशमुख देशमुख, डॉ.सुशिल लंगडे,श्रीमती सुरजबाई शर्मा,श्रीमती सुर्यकांताबाई माणके यांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या प्रास्ताविकातुन प्रेस क्लबचे संस्थापक श्यामशील भोपळे यांनी प्रेस क्लबचे कार्य व या शिबिरामागचा उद्देश समजावून सांगितला तर ठाणेदार विजय चव्हाण यांनी प्रेस क्लबच्या या सामाजिक उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले. या शिबिरात डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगावच्या डॉ.महेश देशमुख, डॉ.सुशील लांडगे,डॉ.दिनेश चौधरी, डॉ.अमिन दळवी,डॉ.चाणक्य,डॉ.आशुतोष,डॉ.अभय लोखंडे, डॉ.रितू रावल इत्यादी तज्ञ डॉक्टर मंडळीने आपली वैद्यकीय सेवा पुरवली.प्रेस क्लब हिवरखेड नेहमीच सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक कार्यक्रम राबवत असते.कोरोना काळात प्रेस क्लब हिवरखेडने प्रशासनाला उल्लेखनीय सहकार्य केले होते.हे शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रेस क्लबचे अध्यक्ष रितेश टीलावत,किरण सेदानी,महेंद्र कराळे,मनिष भुडके,सुनिल बजाज,जितेंद्र लाखोटीया, बाळासाहेब नेरकर,प्रशांत भोपळे,गोवर्धन गावंडे,मनोज भगत,जमीर शेख,सुदाम राऊत,संजय माणके,फारुख  सौदागर,केशव कोरडे,राजेश अस्वार,यांच्यासोबत हिवरखेड येथील प्रभारी वैद्यकीय अधिकारी कु.दीक्षा बजाज मॅडम,मेडिकल ड्रगिष्ट अँड केमिस्ट असोसिएशन हिवरखेड, डॉ.ब्रम्हदेव घाटे, डॉ.ज्ञानेश्वर घाटे,टूनकी येथील सामाजिक कार्यकर्ते धर्मेंद्र इंगळे,भाऊसाहेब वेरुळकर,संवाद परिवाराचे स्नेहल भोपळे, प्रा.गणेश भोपळे,सुनिल वाकोडे सर,अनंत भोपळे,अंबादास चाफे,गजानन पवार,निलेश दांडगे ,श्रीमती मधुबाला शर्मा तसेच भोपळे विद्यालयातील स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया---

प्रेस क्लब व संवाद परिवार हिवरखेडने आयोजित केलेल्या या आरोग्य शिबिराचा सर्व रुग्णांना फार मोठा फायदा झाला.अकोला येथे भाडे खर्च करून २००० रु. मिळणारा इको फक्त २० रुपयात मिळाला.रुग्णांना ही सोय उपलब्ध करून दिल्याबद्दल मी सर्व रुग्णांच्या वतीने प्रेस क्लब व संवाद परिवाराचे आभार मानतो.....काशिनाथ अस्वार.

Previous Post Next Post