महापुरुषाचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून कार्य करा..प्रा प्रेम मनवर (बसपा जिल्हाध्यक्ष)


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

महापुरुषांचे स्वप्न साकार करण्यासाठी बसपा कार्यकर्त्यांनी एकजुटीने संघटन बांधणी करून त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन बसपा जिल्हाध्यक्ष प्रा. प्रेम मनवर यांनी व्यक्त केले.बहुजन समाज पार्टीची अमरावती जिल्हा कार्यकर्ता बैठक आज दि.२५ सप्टेंबर २०२२ रोजी अमरावती येथील संघमित्रा वसतीगुह येथे आयोजीत केली होती.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.प्रेम मनवर बसपा जिल्हाध्यक्ष उपस्थित होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून माजी प्रदेश महासचिव  इंजि.दादाराव उईके, माजी प्रदेश सचिव राजू बसवनाथे,जिल्हा प्रभारी रामभाऊ पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल नफीजभाई, जिल्हा महासचिव मनोज मेळे,जिल्हा सदस्य भगवान लोणारे, हिरालाल पांडे,अमरावती शहर अध्यक्ष सुदाम बोरकर,अब्दुल कादर, भाऊराव वानखडे, किरण सहारे ,अमोल धानके ,जी. एस. खांडेकर, विठ्ठलराव डोंगरदिवे ,चिंतामण खोब्रागडे ,चंद्रमणी डोंगरे, एड. उज्वल सोनवणे ,रामदास कुरवाडे, अँड.भूषण खंडारे ,प्रा.प्रमोद मेश्राम, मिलिंद दहिवडे ,प्रकाश भोजराज, पांडुरंग सवई ,राहुल बेले ,प्रवीण मेश्राम, जितेंद्र पंचगांय,अश्विन मेश्राम, दीपक वानखडे ,डॉ. एम वाय ढोने सह शकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post