अमरावती जिल्ह्यातील बहिरम येथील आदिवासी अनुदानित पंचशील आश्रम शाळेतील 33 विध्यार्थीनी यांना फूड पॉयजन ची घटना रात्री घडली यामधील काही विध्यार्थीनी अचलपूर येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. विध्यार्थीनी यांना विषबाधा होताच पूर्ण आश्रम शाळेतील कर्मचारी मध्ये तारांबळ उडाली, आदिवासी विकास विभाग धारणी अंतर्गत आदिवासी भागातील पालक आपल्या पाल्याला शिक्षणासाठी पाठवतात परंतु कर्मचारी यांचा कुचकामी पणा दिसून ,येतो, विशेष म्हणजे 33 विषबाधा झालेले मध्ये सर्व मुलीच आहे. यामध्ये एकही मुलगा दिसून आला नाही. पंचशील आश्रम शाळेतील शिक्षकांशी बिरसा क्रांति दल संघटने जिल्हा अध्यक्ष अर्जुन युवनाते, ऋषिकेश लाव्हरे, गोलू जयस्वाल, अतुल परतेकी, वैभव लोखंडे यांनी विचारपूस केली असता पाण्याने विषबाधा झालेली आहे , असे सांगण्यात आले. परंतु अमरावती येथे उपचारासाठी दाखल झालेली रोशनी कासदेकर हिच्याशी चर्चा केली असता , शिळी खिचडी खायला दिल्याचे सांगण्यात आले. सोबतच रोज मिळणारे जेवण हे कच्चे असते , असे विविध प्रकार शाळेमध्ये आढळून येऊ शकतात ,कचे अन्न मुलाना जेवायला देत असेल तर हे कुठं तरी शाळा प्रशासनाचा दुर्लक्षित नजरिया यात दिसून येतो , कुठेतरी आदिवासी प्रकल्प अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज असून यावर कडक नियंत्रण करायला हवे , सोबतच अधीक्षक यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी , या संबधित संघटनेच्या माध्यमातून अप्पर आयुक्त शाळेच्या विरोधात तक्रार दिली जाईल.
पंचशील आदिवासी अनुदानित आश्रम शाळेतील 33 विद्यार्थीनींना झाली विषबाधा...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी..