नागरिक त्रस्त, ग्रामपंचायत सुस्त..सांडपाण्यामुळे नागरिकांचे बेहाल...


राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

दर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगाई येथे गावात पक्के रस्ते नसल्यामुळे नागरिकांचे बेहाल होत आहेत. व शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी चिखलातून मार्ग काढून कसरत करावी लागत आहे.मोहम्मद सय्यद   वडनेर गंगाई येथील  गावातील नागरिकांनी  ग्राम पंचायतला  निवेदन देऊन, वार्ड क्रमाक सहा मध्ये सांडपाण्यामुळे  गावातील नागरिकांना व शेतकऱ्यांना  सांडपाण्यामुळे खुप मोठा त्रास होत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाला या गंभीर समस्येचे  लेखी स्वरुपात अर्जाद्वारे निवेदन देऊन सुध्दा कोणत्याही प्रकारची उपाय योजना केली नाही. सांडपाणी समस्येचे निराकरण केले नाही. आणि समस्या असलेल्या ठिकाणाची पाहणी सुद्धा केली नाही.  आता सामान्य माणसाने जगावे तरी कसे हा प्रश्न नागरिकांना  पडला आहे.या समस्येमुळे वार्ड क्रमांक सहा वडनेर गंगाई येथील लोकांचे अतोनात हाल होत आहे.या सांडपाण्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. मलेरिया, डेंगू, टायफाईड यासारख्या संसर्गजन्य रोगांची लागण सामान्य नागरिकांना होत आहे. ग्रामपंचायत वडणेर गंगाई वार्ड नंबर एक मध्ये नाल्यांचे पाणी वार्ड क्रमांक सहा मध्ये येऊन थांबत आहे.हा संतापजनक प्रकार आंधळ्या डोळ्याने  ग्रामपंचायत बघत आहे.आतातरी ग्रामपंचायत प्रशासनाला कुभंकर्णी झोपेतून जाग येईल काय याकडे संपूर्ण गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Previous Post Next Post