जळगाव जामोद मतदारसंघात एकाच दिवशी होणार 40000 विद्यार्थीची नेत्र तपासनी...150 पेक्षा जास्त डॉक्टर्स करणार तपासनी...


जळगांव जा.प्रतिनिधी:-

आ. डॉ. संजय कुटे यांच्या संकल्पनेतुन सेवा पंधरवाड्या अंतर्गत जळगाव जामोद मतदारसंघातील वर्ग 1 ते वर्ग 10 च्या शासकीय  शाळेतील  मुलांची  नेत्र तपासनी, मोफत  चश्मे  वाटप  व उपचार  शिबिराचा भव्य  शुभारंभ केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव  यांच्या हस्ते न प उर्दू शाळा  जळगाव जामोद येथे दिनांक 19 सप्टेम्बर रोजी जळगाव जामोद येथे  करण्यात आला  होता. आज स्थानिक कोटेक्स जिंनिंग येथून  या भव्य  अभियानाला सुरवात झाली  असून मतदारसंघातील 40 हजार  पेक्षा जास्त शाळकारी मुलांची  नेत्र तपासनी आज  दिनांक 22 सप्टेम्बर रोजी करण्यात येणार आहे. यामधे  जळगाव जामोद तालुक्यातील 135 शाळेतील  21000 विद्यार्थी, संग्रामपुर तालुक्यातील 106 शाळेतील  13000 विद्यार्थी तर  शेगांव तालुक्यातील 5335 विद्यार्थी सहभागी  होणार आहेत, अश्याप्रकारे 248 शाळेतील  40000 विद्यार्थियांची नेत्र तपासनी  केल्या जाणार आहे, त्यासाठी जिल्हाभरातुन  आर. बी. एस. के. डॉक्टर व सी एच ओ डॉक्टर असे मिळून 150 पेक्षा जास्त डॉक्टर्स जळगाव  जामोद मतदारसंघात आज सकाळी  दाखल झाले होते . तर त्यांना 200 पेक्षा जास्त शिक्षक  मदत  करणार  असून जळगाव जामोद मतदारसंघातील  40 हजार  मुलांची नेत्र तपासनी  केली जाणार आहे. या तपासनी अंतर्गत नेत्र दोष  असलेल्या मुलांना मोफत  चश्मे  वाटप  करण्यात येणार आहेत  तर  गंभीर  दोष  असल्यास त्यांना पुढील  पूर्ण उपचारासाठी मुंबई  येथे  नेण्यात येणार आहे. यावेळी सौ  अपर्णा संजय  कुटे यांनी उपस्थित डॉक्टर्स व शिक्षकांना या अभियानचे  महत्व विषद  करीत  यामुळे गोर गरीब  मुलांना लाभ  मिळणार आहे  तेव्हा आपण सर्वानी स्वताला झोकून  हे कार्य करावे व स्व. श्रीराम कुटे गुरूजी चैरिटेबल ट्रस्टच्या या संकल्पनेला पूर्णत्वास नेन्यासाठी अमूल्य सहकार्य व वेळ दिल्याबद्दल आभार  व्यक्त केले.यावेळी डॉ कृष्णराव तायडे, डॉ डाबरे, डॉ बोम्बटकार, त्यांचे सर्व सहकारी व इंगळे सर, सातव सर व त्यांचे सर्व सहकारी  शिक्षक उपस्थित होते.

Previous Post Next Post