जीवन विकास संस्था गेल्या दोन दशकापासून समाजातील दुर्लक्षित व गोरगरीब आदिवासी समुदायासाठी आणी त्यांचा सामाजिक आर्थिक विकासासाठी प्रयत्नशील आहे.संस्थे अंतर्गत चिखलदरा तालुक्यातील चुरणी ढाणा , दहेंद्री,पलस्या ,कोटमी, दहेंद्री ढाणा, गांगरखेड़ा,पाचडोंगरी,कनेरी ,कोयलरी,तोरनवाड़ी या दहा गावामध्ये जीवन विकास संस्थेअंतर्गत उत्थान प्रकल्प राबविल्या जात आहे. प्रकल्पाचा माध्यमातून आदिवासी समुदायासाठी शेतकरी महिला - पुरुष ,किशोरी मुली,कुपोषित बालक यांचा जीवन मानाचा दर्जा उचवावा आणी ते विकासाच्या मार्गावर यावेत या उद्देशाने प्रकल्प कार्य करीत आहे.शिबिरात ५ गावातील आदिवासी समुदायातील २३४ शेतकरी महिला पुरुष शिबिराला मोठ्या संख्यने संघटित झालेले पाहायला मिळाले.या वेळी डॉ.सिस्टर सोफी(संत मेहरी आरोग्य केंद्र असदपुर)यांनी शिबिराला आलेल्या लोकांचा उपचार करून औषधोपचार दिले.आपले आरोग्य स्वस्थ कसे राहिल व आपण निरोगी आरोग्य कसे जगणार आहे या विषयी आदिवासी समुदायाला मार्गदर्शन करत महत्व पटवून सांगितले.त्याच बरोबर त्यांचा कार्याला साथ देण्याकरिता सिस्टर मेरी(दया सागर रुग्णालय कुसुमकोट) आणी नर्स प्रतीक्षा हेरोड़े यांनी साथ दिली. या शिबिराला पोलिस पाटिल अनिता चिमोटे (पलस्या) आशा सेविका सविता चिमोटे ,रोजगार सेवक राजेश भागवत, संजू साकोम सरपंच (दहेंद्री ढाणा ) रोजगार सेवक नंदू उइके शिबिराला यांची प्रमुख उपस्थिती होती.शिबिराच्या यशस्वीते करिता वेळोवेळी मार्गदर्शन करणारे जीवन विकास संस्था येथील संचालक फादर जोशफ कुन्नाप्पली यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.कार्यशाळेला प्रकल्प सन्मवयक अक्षय अरुण पारिसे ,एनिमेटर विनोद धिकार,शिवम नितनवरे,उपस्थित होते.कार्यशाळेचे सुत्रसंचालन करिश्मा बड़ोड़कर यांनी केले .मानस यूनिडास यांच्या सौजन्याने आरोग्य शिबिर कार्यशाळा योग्य रीतीने पार पडली.
जीवन विकास संस्थेचा वतीने उत्थान प्रकल्पाचा माध्यमातून आरोग्य शिबिर संपन्न..आरोग्य शिबिर ठरले उल्लेखनीय...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...