"ATL मॅरेथॉन स्पर्धा 2021" या स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतातील शाळांनीं सहभाग घेतला होता. या पैकी संपूर्ण भारतातून ३५० शाळांना पात्र करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील १३ शाळांना यश आले असून अती दुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या अमरावती जिल्ह्य़ातील मेळघाट मधील दुनी या गावातील "ज्ञानमंदिर हायस्कूल, ही शाळा महाराष्ट्रातून २ री तर देशातील 350 शाळांमध्ये 63 व्या क्रमांकाने विजयी झाली आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये ज्ञानमंदिर हायस्कूल दूनी एकमात्र शाळा पात्र ठरली आहे. म्हणजेच भारतामध्ये दुनी येथील ज्ञानमंदिर हायस्कूल शाळा 63 व्या क्रमांकावर आघाडीवर ठरली आहे. या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री भापकर सर व Atl in charge खरात सर यांचे मोलाचे योगदान आहे. या यशा साठी संस्थेचे संस्थापक श्री. नाना साहेब भिसे , अध्यक्ष वीणा ताई मालवीय, उपाध्यक्ष अनंत भिसे , सचिव रमेश जिराफे, कार्याध्यक्ष प्रदीप भिसे , सदस्य रमेश मालवीय, अरविन मेहता, माधुरी भिसे, उज्वला भिसे, तुळशीराम जिराफे, व सामाजिक कार्यकर्ते शुभम जिराफे यांनी या अभिनंदन केले आहे.
ATL मॅरेथॉन स्पर्धेत अमरावती जिल्यातील दुनी येथील शाळा महाराष्ट्रात दुसरा नबंर...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...