बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:-
बुलढाणा जिल्ह्याचे खासदार तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे शिवसेना संपर्कप्रमुख केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष शिवसेना नेते प्रतापराव जाधव यांनी आज दिनांक 23 सप्टेंबर रोजी बुलढाणा येथे देविदास घोपे या सर्वसामान्य शिवसैनिकाची उपजिल्हाप्रमुख पदी निवड झाल्याने त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच यावेळी खासदार प्रतापराव जाधव यांनी मार्गदर्शन करताना जनतेची कामे करा व पक्षवाढी करिता जोमाने कामाला लागा असे आदेश दिले सदर कार्यक्रमाला शिवसेना तालुका प्रमुख शेगाव उमेश पाटील, श्याम अकोटकार, जळगाव जामोद तालुका उपप्रमुख संजय धुळे, गजाननराव देशमुख, युवा सेना तालुका प्रमुख गणेश वसुले, उपविभाग प्रमुख गजानन कापरे, श्रीकांत शिंमरे, रवी घोलप यांच्यासह बहुसंख्य शिवसैनिकांची यावेळी उपस्थिती होती.