राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
ज्याठिकाणी मुलांना ज्ञानाचे पाठ शिकवले जाते अश्याच
मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यातील गंगाधरी या छोट्याश्या गावातील चिमुकल्यांना गटारगंगेतुन प्रवास करून ज्ञान प्राप्त करावे लागत असल्याचे धक्कादायक वास्तव दिसून आले.या गंभीर प्रकारामुळे चिमुकल्यांचे आरोग्य तर धोक्यात आलेच शिवाय जिवालाही धोका निर्माण झाला आहे परिणामी पावसाळ्याच्या दिवसात एखाद्यावेळी अनुचित घटना घटण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही करिता प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी एकतर त्या पुलावर पूल बांधावा नाहीतर ती शाळा इतरत्र हलवण्याची गरज निर्माण झाली आहे.मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यातील टेम्बृंसोंडा सर्कल मधील गंगाधरी गावात ज्या ठिकाणी शिक्षणाची गंगा वाहते त्याच ठिकाणाहून गटारगंगा वाहत असल्याचा धक्कादायक प्रकार दिसून आला आहे या प्रकारामुळे मुलांच्या जीवाला धोका तर निर्माण झालाच शिवाय आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे गंंगाधरी गावात पहिली ते पाचवी पर्यंत शाळा आहे ज्याठिकाणी हि चिमुकले शिक्षण घेतात त्याच ठिकाणी मोठा नाला आहे त्या नाल्यातून घाणरडे पाणी वाहत असल्याने येथील चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे सोबतच पावसाळ्याच्या दिवसात या नाल्याला पूर आला की चिमुकल्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो या गंभीर बाबीकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे शासन एकीकडे शिक्षणापासून कोणीच वंचित राहू नये म्हणून प्रयन्त करीत आहे त्यासाठी सर्व शिक्षण अभियानातून करोडो रुपय खर्च करून शाळेसाठी इमारत बांधत आहे आणि दुसरीकडे गंगाधरी या छोट्याश्या गावातील शाळेकडे दुर्लक्ष करीत आहे या शाळेला जाण्याकरिता दुसरीकडून मार्ग नसल्यामुळे घाणेरड्या पाण्यातूच वाट काढत शाळेत जावे लागत असल्याचे पाहायला मिळाले या नाल्यातील पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी येत असून घाणेरड्या पाण्यामुळे चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात आले त्याकरिता या ठिकाणी एकतर पुलाचे बांधकाम करण्याची गरज आहे नाहीतर त्या ठिकाणाहून शाळा इतरत्र हलवण्याची अत्यंत गरजेचे आहे