जळगाव जामोद तालुक्यामध्ये एकूण सातशे घरकुल लाभार्थ्यांचे जागे अभावी घरकुल प्रलंबित असून,ज्या गावांमध्ये लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा नाही अशा लाभार्थ्यांना एकत्र येऊन ग्रामपंचायती च्या मार्फत त्या लाभार्थ्यांना काही गुंठे जागा तुकडाबंदी कायद्याअंतर्गत उपलब्ध करता येते. परतु दुय्यम निबंधक अधिकारी सदर घरकुल लाभार्थ्यांना तुकडाबंदी कायद्याअंतर्गत जमिन खरेदी करता येत नाही.तसेच जमिनी खरेदी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांनी तसे निर्देश दिल्यास आम्ही जमिनी खरेदी करून देऊ. संबंधित अधिकाऱ्याची तक्रार घेऊन लाभार्थ्यांनी जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्याकडे धाव घेतली असता आज दिनांक 14 सप्टेंबर रोजी डॉक्टर संजय कुटे यांनी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी मोरे यांना घेऊन दुय्यम निबंधक अधिकारी कार्यालय गाठले आणि दुय्यम निबंधक अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले आणि याप्रकरणी जळगाव विभागाचे उपविभागीय अधिकारी पंचायत समिती विस्ताराधिकारी मोरे व दुय्यम निबंधक अधिकारी चव्हाण यांना एकत्रित बसून तुकडा बंदी कायद्या व अंतर्गत लाभार्थ्यांना जमिनी खरेदी करण्याकरिता काय तोडगा काढता येईल असे निर्देश देऊन सातशे घरकुल लाभार्थ्यांचा घरकुलाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावून त्यांचे घरकुल प्रलंबित असलेले प्रस्ताव मार्गी लावण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी आमदार डॉक्टर संजय कुटे, विस्ताराधिकारी संदीप मोरे, दुय्यम निबंधक अधिकारी चव्हाण, गजानन सरोदे, यांच्यासह तालुक्यातील घरकुल लाभार्थी यावेळी उपस्थित होते.
तालुक्यात सातशे घरकुल प्रलंबित.. दुय्यम निबंधक अधिकाराला घेतले आमदार कुटे यांनी धारेवर...
जळगांव जा.प्रतिनिधी:-