पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसा निमित्ताने जळगाव जामोद मतदारसंघात सेवा कार्यक्रमांचे आयोजन..आ.डॉ. संजय कुटे घेणार कुपोषित बालकांना दत्तक..


जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव  जामोद मतदारसंघामध्ये देशाचे यशस्वी पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमिवर आरोग्य सेवा, स्वच्छता अभियान व वृक्षसवर्धन या प्रकारचे  उपक्रम हाती घेऊन ते शेगांव, जळगाव जामोद व संग्रामपुर या मतदारसंघातील तिनही तालुक्यामध्ये दिनांक 17 सप्टेंबर पासुन दिनांक 2 ऑक्टोबर या दरम्यान सेवा पंधरवाड़ा साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये जळगांव जामोद  मतदारसंघतील गोरगरीब  जनतेसाठी कल्याणासाठीचे  अनेक कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या सेवा कार्यात मतदारसंघातील वर्ग एक ते वर्ग 10 पर्यंतच्या नगरपरिषद, जिल्हापरिषद व आश्रमशाळा अश्या शासकीय शाळेतील विद्यार्थीँची मोफत नेत्र तपासनी, चश्मे  वाटप व यापेक्षा इतर  उपचारांची गरज असल्यास पुढील  उपचार,भारीतीय  जनता युवा मोर्चा तर्फे भव्य  रक्तदान शिबिर, गोरगरीब व मजूर बांधवाना छत्री  वाटप, वृक्षारोपण, खादीच्या व बचत गटाच्या वस्तुची प्रदर्शनी व विक्री, स्वच्छता अभियान, दिव्यांग बंधुना कर्णयंत्र सायकल या सारख्या विविध उपयोगी वस्तुचे मोफत  वाटप तसेच स्व.श्रीराम जी कुटे गुरूजी चैरिटेबल  ट्रस्ट द्वारे मतदारसंघतील कुपोषित  बालकांसाठी आ  डॉ संजय  कुटे यांचे  माध्यमातून दत्तक  योजना, तसेच  मतदारसंघातील क्षयरोगा ने ग्रासलेल्या व्यक्तिच्या उपचाराची, पोषनाची व रोजगाराची लोकसहभागातून आवश्यक  ती मदत. यासारखे विविध  कार्यक्रम जळगाव  जामोद मतदारसंघात राबविण्यात येणार आहेत. तरी मतदारसंघातील गोरगरीब नागरिकांनी व गरजुन्नी यांचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन जळगाव  जामोद तालुका अध्यक्ष प्रकाश वाघ, संग्रामपुर तालुका अध्यक्ष  लोकेश राठी व शेगांव  तालुका अध्यक्ष  विजय भालतीडक यांनी केले आहे.

Previous Post Next Post