जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बालकांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्यामुळे येथील नागरिकांनी आरसी 24 च्या माध्यमातून आपल्या व्यथा सांगितल्या. सुनगाव येथील वार्ड क्रमांक एक मध्ये चरणसिंग राजपूत यांचे घर ते अंगणवाडी क्रमांक तीन पर्यंतचा रस्ता अत्यंत चिखलमय झालेला असून त्या ठिकाणी पावसामुळे पाणी तुंबुन मोठमोठे गटार तयार झाले आहे. या तुंबलेल्या पाण्यामुळे मच्छरांचा त्रास मोठ्या प्रमाणात होऊन येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून या रस्त्यामधून लोकांना जाता येता येत नाही. अंगणवाडी केंद्रामध्ये लहान बालके पाण्यामधून ये जा करीत आहेत. येथील नागरिकांनी कित्येक वेळा सरपंच रामेश्वर अंबडकार,ग्रामपंचायत वार्ड मेंबर द्रोपदी गवई ,योगीता कुरवाडे,राहुल इंगळे यांना सुध्दा वारंवार फोनवरून याबाबत माहिती देऊनही त्यांनीही तुंबलेल्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला नाही की त्या ठिकाणी जाण्या-येण्याकरिता रस्त्यात मुरूम टाकला नाही. त्यामुळे या रस्त्यावरून जात असताना एक गरोदर महिला पाय घसरून पडल्याने तिला तात्काळ रुग्णालयात हलवावे लागले, त्यामुळे येथील नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात तीव्र असंतोष व्यक्त केला. पावसाळा चालू होऊन चार महिने उलटत आले तरीही ग्रामपंचायत प्रशासन या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावत नाही त्यामुळे येथील नागरिक चरणसिंह राजपूत,रामदास गिर्हे, श्रीराम धुळे, गजानन धुळे,रामेश्वर भड,रतन दामधर,सुनिता भड,वत्सला कतोरे,शांता कोथळकार, यांनी दिनांक सात सप्टेंबर रोजी रस्ता दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी ग्रामपंचायतला लेखी विनंती केली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने हा रस्ता लवकरच चिखल मुक्त करावा. व येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्यापासून वाचवावे सदर रस्त्या आठ दिवसांमध्ये दुरुस्त न केल्यास ग्रामपंचायत प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने हा रस्ता वेळीच दुरुस्त करावा अन्यथा येथील नागरिकांच्या रोशाला सामोरे जावे लागेल.
ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे लहान बालकांसह मोठ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात...सुनगाव ग्रामपंचायत चा गलथान कारभार..
जळगांव जा.प्रतिनिधी:-