जळगांव जा.प्रतिनिधी:-
माझ्या मतदारसंघातील माझ्या आई-वडिलां समान असलेल्या वयोवृद्ध नागरिकांची मोतीबिंदू मधून मुक्तता करण्यासाठी स्व.श्रीराम कुटे गुरुजी चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून काम करण्यास सुरुवात केली आहे.यामध्ये आई-वडिलांचे आशीर्वाद म्हणून ज्या नागरिकांना मोतीबिंदूचा त्रास आहे अश्या गरजू नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाते.आरोग्या बाबतीत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी व मतदारसंघातील जनतेची अविरत सेवा करण्याची संधी मिळावी हाच एकमेव हेतू ठेऊन मी हे कार्य करतो आहे. माझ्या आई-वडिलांसमान वयोवृद्ध नागरिकांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक लहानसा प्रयत्न आहे.याच अनुषंगाने आज रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली असून सर्वांवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली असून, आपल्या घरी परतले आहेत.