मेळघाट हा अतिदुर्गम व आदिवासी बहुल भाग आहे. मेळघाटात प्रत्येक व्यक्ती कडे जनावरे आढळून येते.मेळघाटाला लागून मध्यप्रदेश सीमा आहे.मध्यप्रदेशातुन मेळघाटात आलेल्या लॅम्पी व्हायरसमुळे धारणी भागातील पाळीव प्राणी हजारोंच्या संख्येने संक्रमित झाल्याने आदिवासी शेतकरी तथा पशुपालक लोकांवार संकटाचा सावट कोसळले आहे.प्रामुख्याने झिल्पी,साद्राबाडी,कुसुमकोट,धारणी,खाऱ्या,धुळघाट,बैरागड,पाडीदाम,यासारख्या मध्यप्रदेशच्या सिमेवरील बैल,गाई, म्हशीवर लॅम्पी व्हायरसचा(लॅम्पी स्कीन डीसीस)कहर जास्त प्रमाणात दिसत आहे.धारणी तालुक्यातील झिल्पी गावात लॅम्पीने ग्रस्त सर्वात जास्त जनावरे असून अनेकांचे जीव धोक्यात आले आहे.लॅम्पी स्कीन डीसीस हा चर्मरोग असून जनावरांचा शरीरावर गाठी येतात ताप१०४-१०५ पर्यंत पोहचून प्राणी चारा खाणे सोडून देत असल्याने प्रकृती आणखी गंबीर होते.एका माहिती प्रमाणे लॅम्पी व्हायरसचे वाहक म्हणजे माशी आणि डास असतात.यासाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्प जारीदा कार्यालयाकडून लॅम्पी व्हायरस बदद्ल जनजागृती करण्यात येत आहे. जारीदा या गावात संदीप राऊत वर्तुळ अधिकारी जारीदा,रमेश धांडे वनरक्षक,पंढरी साठे वन कर्मचारी यांनी लोकांना लॅम्पी व्हायरशा बद्द्ल मार्गदर्शन केले.जनावरे स्वच्छ ठिकाणी बांधण्याची गरज आहे प्रत्येक पशुपालकाने याची काळजी घ्यावी.जनावरांचे गोठे निर्जंतुक करण्यासाठी फवारणी आवश्यक आहे.गाई व म्हशीचे दूध जास्त उकळून पिणे जरुरी आहे.काही लक्षणे दिसून आल्यास तात्काळ नजीकचे पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून उपचार करावे.जेणेकरून जनावरे जास्त प्रमाणात दगावले जाणार नाही याची काळजी प्रत्येक पशुपालकाने घ्यावी. गाई, बैल,म्हशी शेतातून आणल्यानंतर चांगल्या पद्धतीने हात पाय स्वच्छ करावे व सर्व जारीदा गावातील लोकांना वन विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले की, गावातील जनावरांमध्ये असे काही लक्षण दिसून आल्यास तात्काळ संपर्क साधावा.आपल्याला मेळघाट व्याघ्र प्रकल्प जारीदा कार्यालयाकडून मदत करण्यात येईल असे आवाहन संदीप राऊत वर्तुळ अधिकारी मेळघाट व्याघ्र प्रकल्प जारीदा यांनी जारीदा गावातील लोकांना केले.जारीदा कार्यालय अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावात मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वनकर्मचारी लॅम्पी स्कीन डीसीस व्हायरासाबद्धल मार्गदर्शन तथा जनजागृती करणार अशी माहिती वन कर्मचारी यांनी दिली.गावात लॅम्पी व्हायरस येणार नाही याची काळजी प्रत्येक ग्रामवाशी व पशुपालकाची जबादारी आहे.गावात अशी काही लक्षणे असलेली जनावरे दिसून आल्यास तात्काळ माहिती दयावी.सर्व पशुपालकाने आपल्या गोठा स्वच्छ ठेवावे.व पशुवैद्यकीय अधिकाराचा सल्ल्याने फवारणी करावी.या प्रकारे मेळघाट व्याघ्र प्रकल्प जारीदा कार्यालयाकडून लॅम्पी व्हायरस बद्धल जनजागृती करण्यात आली.सुनील परते, शंकर मोरे,साबूलाल धिकार,चतुर पांडे,सुनील पाटणकर,परसराम जी बिसंदरे,उमेश बिसंदरे,सहदेव पांडे,मनीष पांडे,रवींद्र मोरे,राजेंद्र मोरे,मिथुन बिसंदरे,संदीप बिसंदरे,मुन्नी उईके,जमुना मोरे व गावातील नागरिक उपस्थित होते.
मेळघाटाच्या जनावरांवर 'लॅम्पी 'ची काळी छाया.हजारो पाळीव प्राणी संक्रमित ,मेळघाट व्याघ्र प्रकल्प जारीदा कार्यालयाकडून जनजागृती...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी..