जळगाव जा.प्रतिनिधी;-
जळगाव जामोद येथील सांस्कृतिक सभागृहात आज दिनांक 30 सप्टेम्बर रोजी खादी चे कपडे व बचत गटांचे द्वारे निर्मित वस्तु ची प्रदर्शनी व विक्री मेळावा संपन्न झाला. या ठिकाणी जळगाव, संग्रामपुर व शेगांव या तिनही तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील 60 पेक्षा जास्त बचत गट सहभागी झाले होते. सेवा पंधर वाड्या अंतर्गत आयोंजीत या कार्क्रमास मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते व त्यांनी येथील अनेक वस्तुँची खरेदी केली. आपल्या भागातील बचत गट चांगले प्रोडक्ट तयार करतात परंतु पैकेजिंग चा आभाव व विक्री साठी बाजार उपलब्ध नसल्याने त्यांच्या ह्या वस्तु पाहिजे त्या प्रमाणात विक्री होत नाहीत त्यामुळे येथून पुढे याबाबत बचत गटाना पूर्ण मार्गदर्शन आणि मदत करणार असल्याचे आ डॉ संजय कुटे यांनी यावेळी सांगितले. तसेच डॉ अपर्णा कुटे ह्या पुढे महिला बचत गटा सोबत मिळून पैकेजिंग व मार्केटिंग याबात कार्य करनार असल्याने व राज्य आणि केंद्र सरकार च्या विविध योजना नचा लाभ बचत ग़टाना मिलावा यासाठी सुद्धा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच महिला बचत गटाच्या निर्मित वस्तु विक्री व्हाव्या यासाठी मतदारसंघत ठीकठिकाणी विक्री केंद्र सुद्धा उभे करणार असल्याचे आश्वासन आ डॉ संजय कुटे यांनी यावेळी उपस्थितना दिले. या कार्यक्रमचे सयोजन व प्रस्ताविक जळगाव नगरपालिकेचे इंगळे साहेब यांनी केले. या कार्यक्रमात शहरातील नागरिक, अधिकारी व कर्मचारी तसेच भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. तर जळगाव जामोद, संग्रामपुर व शेगांव या तीन ही तालुक्यातील बचत गटनी यावेळी सहभाग नोंदवीला होता.
