जळगांव जा.प्रतिनिधी:-सागर झनके..
गेल्या आठवडा भरापासून विदर्भात पावसाची जोरदार बँटीग सुरू आहे...बुलढाणा,अमरावती, वर्धा,नागपूर ,अकोला जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत असून छोटी मोठी नदीनाले काठोकाठ भरून वाहू लागली आहेत...धरणातुनही सुद्धा मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे.त्यामुळे पुर्णा नदिला भला मोठा पूर आला आहे...नदीपात्रात पाण्याची आवक सातत्याने वाढत असून पुर्णा नदी दुथडी भरून वाहत आहे...पाण्याच्या पातळीच सुद्धा वाढ होत असून माणेगाव जवळ असलेला पुर्णा नदीवरील पुलावरून पाणी वाहत आहे,खबरदारी चा उपाय म्हणून जळगाव जामोदचे कर्तव्यदक्ष ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासणाच्या वतीने पुर्णा नदिच्या पुलावर कुठलाही अनुचीत प्रकार घडू नये राकरिता सुरक्षा ठेवण्यात आली आहे...पुलावरून पाणी झाल्यास नांदुरा जळगाव जामोद मार्ग वाहतुकिसाठी बंद होऊ शकतो...