वन विभागाच्या मोताळा रेंज मधील कामाच्या अनियमिततेची चौकशी करून भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा अन्न त्याग आंदोलन...


बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:-

वर्षाताई ताथरकार यांनी जिल्हा अधिकारी बुलढाणा यांना 9 सप्टेंबर 2022रोजी निवेदन दिले निवेदनात नमूद केले की,नेहा मुरकुटे वन परिक्षेत्र अधिकारी मोताळा यांनी आपल्या अधिकाराचा गैर वापर करून  खैरखेड येथे झालेल्या मेंढपाळ व रोजंदारी मजूर यांचे संघर्षाला भंपक स्वरूप देऊन घटना घडल्या नंतर सर्व शांतता असताना गोळीबार कण्याचे नाटक केले,गोळीबार करतांना नियमाचे पालन केले नाही,शासकीय नियमान केराची टोपली दाखवत नियम बाह्य काम केले  तसेच खैरखेद येथील  नवीन लागवड  केलेल्या रोपवना मध्ये कोणत्याही  प्रकारची परवानगी नसताना वन्य प्राण्यांच्या जीवाची व जीव विविधतेचे  पर्वा न करता तन नशकाची फवारणी करत जैव विविधतेला धोका निर्माण केला,वन्य जीवांच्या रक्षणा करिता नेमलेले अधिकारीच वन्य जीव धोक्यात घालत आहेत,वन्य प्राण्यांचा अन्न चारा नष्ट करणाऱ्या भ्रष्ट व नियम बाह्य काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषी अधिकारी यांना निलंबित करा,व पिक नुकसानीची भरपाई त्यांच्या पगारातून करा, तसेच मोतला रेंज मधील कामाची व अनित्मित्ते ची बाह्य यंत्रणा मार्फत चौकशी करा,अन्यथा लोकशाही मार्गाने अन्न त्याग आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला,निवेदनाच्या प्रती वन मंत्री महाराष्ट्र, वन बल प्रमुख नागपूर, उप वन संरक्षक बुलडाणा,पोलिस अधीक्षक बुलडाणा यांना देण्यात आल्या.

Previous Post Next Post