प्रभाग १३ मध्ये ७ कोटीच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम व वितरण व्यवस्थेचा भूमिपूजन सोहळा माजी मंत्री आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते संपन्न...


 शेगाव ता.प्रतिनिधी:-

केंद्र सरकारच्या धोरणानुसार आध्यात्मिक शहरामध्ये २४ तास पाणीपुरवठा सुरु ठेवण्याचे नियोजन असतांना राज्यातील ३ आध्यात्मिक शहरांची निवड या योजनेत करावयाची होती त्यामध्ये संतनगरी शेगाव शहराचा समावेश करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला व समावेश करून घेतला असून २३० कोटीच्या योजनेला तत्त्वता मान्यता देखील मिळाली आहे त्यामुळे लवकरच संतनगरीचा पाणीपुरवठा २४ तास सुरू राहणार असल्याचे प्रतिपादन  माजीमंत्री तथा आमदार डॉ.संजय कुटे यांनी केले आहे.३ सप्टेंबर रोजी प्रभाग क्र.१३ मध्ये नागझरी रोडवर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत नगरपरिषद हद्दीत ७ कोटी रुपयांच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम व वितरण व्यवस्थेच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आ.डॉ.संजय कुटे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी माजी नगराध्यक्ष शरदसेठ अग्रवाल, पी.एम.शेगोकार, पांडुरंग बुच, रविकांतदादा पाटिल, जिल्हा सचिव डॉ.मोहन बानोले, माजी सभापती संजय कलोरे, गजाननराव जवंजाळ, पवन महाराज शर्मा, युवानेते ऍंड. समीर मोरे, प्रदेश सदस्य राजेंद्र शेगोकार, जिल्हा सरचिटणीस संतोषबाप्पू देशमुख, सौ.कल्पनाताई मसने, सौ.सुषमाताई शेगोकार, शहराध्यक्ष ज्ञानेश्वरआप्पा साखरे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना आ.कुटे म्हणाले की, संतनगरीच्या विकासासाठी कटिबद्ध असून शहरातील प्रत्येक भागाचा, प्रत्येक समाजाचा व समाजातील प्रत्येक घटकाचा विकास हेच ध्येय ठेवून काम करत राहील. शहराच्या वाढीव भागासाठी देखील कोट्यावधी रुपयांचा निधी खेचून आणणार आहे त्यामुळे शेगावला निधीची कधीही कमतरता भासणार नाही कारण भाजप - सेना (शिंदे) गटाचे सरकार हे जनतेचे सरकार आहे. व्हिजन ठेवून काम करणारे, जनतेला वेळ देणारे, विकासाला वेग देणारे हे सरकार आहे. त्यामुळे शहराच्या विकासाला आता कोणीही रोखू शकत नाही. आपण सर्व जनतेने जातीपातीच्या भिंती तोडून आगामी निवडणुकांमध्ये भाजपासोबत, विकासासोबत राहावे असे आवाहन कुटे यांनी केले. याप्रसंगी महिला जिल्हा सरचिटणीस डॉ.अंजुषा भुतडा, महिला शहराध्यक्ष डॉ.ज्योती भुतडा, रजनीताई पहुरकर, नितीन शेगोकार, युवा मोर्चा शहराध्यक्ष विजय लांजुळकर, अशोक चांडक, सचिन धमाळ, राजु अग्रवाल, किसान आघाडी शहराध्यक्ष राजेंद्र भिसे आ.कुटे यांचे स्वीय सहाय्यक डॉ.इक्बाल शेख, प्रकाश राऊत, नंदू शेगोकार, शिवसेनेचे संतोष घाटोळ, ऋषिकेश भारती, रामदास घुले, उमेश राजगुरे, पुरुषोत्तम हाडोळे, राजू सुरवाडे, शंकर पाटिल, प्रमोद काठोळे यासह अनेकांची उपस्थिती होती.

#आ.संजय कुटे यांचे ठिकठिकाणी स्वागत

प्रभाग १३ मध्ये पाण्याच्या टाकीच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी पायी चालत जात असताना प्रभाग १३ मधील महिला व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात ठीकठिकाणी आमदार डॉक्टर संजय कुटे यांचे पिण्याच्या पाण्याच्या टाकीसाठी भरघोस निधी उपलब्ध करून देत वचनपूर्ती केल्याबद्दल स्वागत करून आभार मानले.

Previous Post Next Post