हिवरखेड प्रतिनिधी , प्रशांत भोपळे
हिवरखेड येथे ठीक ठिकाणी भाविकांच्या घरी अडीच दिवसांचे माहेर असलेल्या महालक्ष्मी गणेशाचे आगमन झाले असून प्रत्येक ठिकाणी महालक्ष्मी दर्शनासह महाप्रसाद कार्यक्रम पार पडला आहे, यामध्येच वार्ड क्र ३ मधील पत्रकार गणेश अग्रवाल ,राजुभाऊ बांते, वनकर, बोबळे, यांच्या निवासस्थानी एकाच वेटाळात चार ठिकाणी महालक्ष्मी महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला, वार्ड नंबर ५ मधील गणेश वानखडे तसेच वार्ड क्र २ मध्ये रमेश दुतोंडे प्रभारी सरपंच व बनकर यांच्या निवासस्थानी सुद्धा महालक्ष्मी आगमनाचा कार्यक्रम पार पडला,भाविक महिलानि महालक्ष्मीच्या दर्शना करिता सकाळपासून साज करून मुख पूजन केले, तर दिवसभर परिसरात धार्मिक वातावरण बहरवून आले, गावात ठीक ठिकाणी महालक्ष्मी दर्शनासह महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला,