जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे प्रगती गणेश उत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा गणेश उत्सवा निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दिनांक.३/९/२०२२ शनिवार रोजी रात्री आठ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला बहुसंख्य प्रमाणात जनसमुदाय उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला प्रगती मित्र मंडळ अशा कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी गणेश उत्सवाच्या निमित्ताने करत असते.त्यापैकी अशा नृत्या पैकीच एक भाग, सर्वांना आकर्षित करून या नृत्याचा आनंद गावातील पुरुष मंडळी व महिला या सर्वांनी घेतला. सर्व मंडळाच्या वतीने येणाऱ्या सर्व रसिक प्रेक्षकांचे आभार मानण्यात आले.यावेळी सर्व गावातील तरुण मित्र मंडळी , जेष्ठ नागरिक, तसेच महिला उपस्थित होत्या. आणि सोबत प्रगती मित्र मंडळाचे कार्यकर्ते यांच्या नियोजनात सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.
पिंपळगाव काळे प्रगती गणेश उत्सव मंडळाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन ..
मंगल काकडे /जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी..