विज्ञान प्रदर्शनी मध्ये सेंट पॉल अकॅडमीचे विद्यार्थ्यांची जिल्हास्तरासाठी निवड...


 प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी...

हिवरखेड येथे  तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आलेल होत या प्रदर्शनीचे आयोजन सहदेवराव भोपळे विद्यालय हिवरखेड येथे करण्यात आलेले होतो या विज्ञान प्रदर्शनीमध्ये तालुक्यातील बहुसंख्य शाळांनी सहभाग घेतला होता. यामध्ये सेंटपॉल अकॅडमी हिवरखेडचे इयत्ता सातवीचे विद्यार्थी सौम्य निलेश मगर व रुद्राक्ष विलासराव घुंगड या विद्यार्थ्यांनी फार्मर्स सेफ्टीसाठी एक मॉडेल बनवले होते. यामध्ये आपण बऱ्याचदा पाहतो की पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शेतात हवेमुळे, वादळामुळे इलेक्ट्रिकचे तार तुटून पडलेले असतात आणि शेतकऱ्यांना याची माहिती नसते तर या संबंधीची सूचना शेतकऱ्यांना मिळावी यासाठी हे मॉडेल तयार करण्यात आलेले होते. यामधून शेतकऱ्यांना शेतामध्ये एखादा तार पडलेला असेल आणि त्यामध्ये जर विद्युत प्रवाह असेल तर त्याची सूचना  त्यांना आजूबाजूच्या इलेक्ट्रिक पोल वरील सर्व लाईट ऑन झालेले असतील किंवा लागलेले असतील तसेच जोरजोरात हॉर्न वाजेल ज्यामुळे काहीतरी संकट किंवा धोका आहे याची सूचना शेतकऱ्यांना मिळणार आहे या मॉडेलसाठी  विद्यार्थ्यांचा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये द्वितीय क्रमांक आला असून त्यांची निवड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी साठी झालेली आहे.त्याचबरोबर जय आनंद वानखडे व सुरज सुशील इंगळे  या दहावीच्या विद्यार्थ्यांनी हायवे वर किंवा घाटामध्ये होत असणाऱ्या मोठमोठे एक्सीडेंट रोखण्यासाठी त्यांनी हे मॉडेल तयार केले होते यामध्ये जर एखाद्या गाडीचा अपघात होत असेल तर तो अपघात होण्याअगोदरच त्या गाडीचे हायड्रोलिक पूर्णतः जमिनीला टेकून जाईल यामुळे जीवित हानी होणार नाही व ज्या गाडीचा एक्सीडेंट होणार आहे ती गाडी जागेवरच थांबून जाईल म्हणजे होणारी मोठी जीवित हानी या मधून आपल्याला रोखता येईल. मॉडेलसाठी या विद्यार्थ्यांचा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये चतुर्थ क्रमांक आलेला असून यांची निवड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीसाठी झालेली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनी मध्ये सेंट पॉल ल अकॅडमीचे विद्यार्थी आपल्या मॉडेल्सच्या माध्यमातून वेगवेगळे विषय समोर घेऊन त्यावर अत्यंत समर्पक असं उत्तर किंवा उपाय सुचवण्याचा प्रयत्न करत असतात असे या विज्ञान प्रदर्शनीतून दिसून आलं. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक नवनीतजी  लखोटिया, संस्थेचे उपाध्यक्ष लूणकरंजी डागा तसेच संस्थेचे सचिव प्रमोदजी चांडक यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत तिवारी यांनी  विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनी आपल्या या यशाचे श्रेय शाळेतील विज्ञान शिक्षकांना तसेच आपल्या आई-वडिलांच्या मार्गदर्शनाला दिलेले आहे.

Previous Post Next Post