अनिल भगत/बुलढाणा विशेष....
दिनांक 26 सप्टेंबर रोजी नांदुरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वडणेर भोलजी येथील अब्दुल अजीज यांचे शेतामध्ये कोणीतरी अज्ञात इसमाने दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच नांदुरा पोलीस स्टेशन चे विक्रम राजपूत व ओमसाई फाउंडेशन चे विलास निंबोळकर ऍम्ब्युलन्स घेऊन घटनास्थळावर पोहचले असता अब्दुल अजीज यांचे शेतात निंबाच्या झाडाला एक अनोळखी इसम गळफास घेऊन झाडाला लटकलेला दिसून आला. मृतकाचे प्रेत ओमसाई फाउंडेशन च्या स्वयंसेवकांच्या मदतीने झाडावरून खाली उतरविले व नांदुरा पोलीस स्टेशन चे विक्रम राजपूत व सुनील गायकवाड यांनी कार्यवाही करून पोलीस स्टेशन ला 174 crpc प्रमाणे मर्ग दाखल केला. मृतकाचे वय अंदाजे 40 वर्ष नेसनिस काळ्या राखाडी मळकट रंगाचे टी शर्ट व काळ्या पांढऱ्या रंगाचा बरमुडा आहे .तरी मृतकाची ओळख पटवण्या करिता प्रेत सरकारी दवाखाना मलकापूर येथे शितगृहात ठेवले आहे.सदर च्या कार्यवाहीत ओमसाई फाउंडेशन नांदुरा चे विलास निंबोळकर, पियुष मिहानी,अश्विन फेरण यांची मोलाची मदत झाली .पुढील तपास नांदुरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी करीत आहेत.