मागील 5 वर्षांपासून जळगाव जामोद तालुक्यातील खांडवी ते पिंपळगांव काळे रस्त्याची अवस्था अत्यंत दैनिय झाली आहे या रस्त्याने प्रवास करणे अत्यंत धोकादायक झाले असून ,प्रवासी,रुग्ण,गरोदर स्त्रिया,व विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास व सहन करावा लागत आहे. तसेच वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभाग जळगांव (जा) याना अनेकवेळा निवेदन देऊन सुद्धा या रस्त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असून. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी काळे हे याविषयी कानडाळा करत असून अनेक वेळा निवेदन देऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग कुंभकर्णी झोपेत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व अधिकारी यांना कुंभकर्णी झोपेतून जागे करून रस्त्याचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून आज पिंपळगांव काळे येथील ग्रामस्थांच्या वतीने खड्यांचे पूजन करून निषेध करण्यात आला.या आंदोलनात युवा समाजसेवक प्रकाश भिसे, अमोल हिवराळे, अस्लम खान,बुडन शाह, दिनेश कोळसे, संदीप बहादरे, उमेश जाधव, शेख राईस, रवी जाधव,सचिन वाघ, दामोदर इनकर, अमोल काळसकार, सादिक मण्यार व अनेक गामस्थ उपस्थित होते.
खांडवी ते पिंपळगाव काळे रोडवर खड्डेच खड्डे खड्ड्यांचे पूजन करून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी काळे यांचा करण्यात आला निषेध...
जळगांव जा.प्रतिनिधी:-मंगल काकडे...