स्थानिक हिवरखेड येथिल सरस्वती प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्यामंदिर,हिवरखेड(रुप)शाळेमध्ये दि.17सप्टेंबर 2022 रोजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत भेटवस्तु वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.हिवरखेड शहरातील दानशुर व्यक्ती श्रीमती सुरजबाई चैनकरन शर्मा हे नेहमी शाळकरी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्वरूपात भेटवस्तु देत असतात,परीसरातिल सर्व शाळकरी गरीब गरजु होतकरु विद्यार्थ्यांना नेहमी काही ना काही भेटवस्तु दान स्वरुपात वाटप करत असतात.त्याच प्रमाणे आज आमच्या सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर शाळेमध्ये सुध्दा त्यांनी भेटवस्तु वाटप केले त्यामध्ये त्यांनी आमच्या शाळेला पाच फँन,घड्याळ,व शाळेतिल प्रत्येक शिक्षकांना पेन भेट स्वरुपात वाटप केले. प्रंसगी भेटवस्तु वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव सतिष राऊत होते तर प्रमुख अतिथी म्हणुन संस्थेचे संचालक अरुण कवळकार, तसेच शाळेचे मुख्याध्यापक अमोल भोंगाळे सर,संतोष शर्मा व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष अर्जुन खिरोडकार तसेच शाळेतिल सर्व शिक्षक वृंद तथा विद्यार्थी उपस्थित होते.
सरस्वती विद्यामंदिर शाळेत दानशुर श्रीमती सुरजबाई शर्मा यांच्यातर्फे भेटवस्तु वाटप...
अर्जुन खिरोडकार/हिवरखेड...