देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिनांक 17 सप्टेंबर पासुन सेवा कार्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, त्याची सुरवात आज करण्यात आली आहे. या निमित्ताने जळगांव जामोद येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात जळगाव जामोद व संग्रामपुर तालुक्यातील अनेक भाजपा कार्यकर्ते सहभागी झाले होते.यावेळी 60 रक्तदात्यानी या सेवा कार्यात सहभाग नोंदवित रक्तदान केले. त्याच बरोबर श्री कोटेक्स जिंनिंग येथे बूथ प्रमुख़ाचा मेळावा संपन्न झाला या ठिकाणी जळगाव जामोद मतदारसंघतील तिनही मंडाळा तील सर्व बूथ प्रमुख, शक्ति केंद्र प्रमुख आणि सर्व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आ डॉ संजय कुटे यांनी सर्व बूथ प्रमुखांना संबोधीत करून सेवापंधरवाडा कसा साजरा करावा याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की गरीब कल्याणाच्या योजना लोकांपर्यत पोहचविण्याची एक चांगली संधी भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांना मिळाली असून अतिशय प्रामाणिक पने हे कार्य करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी केल्या. तसेच प्रत्येक भाजापा कार्यकरत्याने सोशल मीडिया सोबतच जनसंपर्कावर जास्तीत जास्त भर देत सतत सेवाकार्य करत राहावे.तसेच याप्रसंगी गोरगरीब जनतेला छत्री चे वाटप करण्यात आले. प्रत्येक बूथ वर 10 याप्रमाने एकूण 3500 छत्रि ह्या पूर्ण 313 बूथ प्रमुखाना सुपुर्द करण्यात आल्या. हे बूथ प्रमुख आपल्या बूथ वर गोरगरीब जनतेस सदर छत्रीचे वाटप करनार आहेत. त्यासोबतच औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगाव जामोद येथे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी ना प्रमाणपत्र चे वाटपाचा कार्यक्रम डॉ कुटे यांच्या हस्ते पार पड़ला. यावेळी आ डॉ संजय कुटे यांनी कौशल्य विकास कार्यक्रम बाबत उपस्थितांना संबोधित केले. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था चे प्राचार्य महल्ले,शिक्षक पवार यांच्यासह कर्मचारीवृद उपस्थित होते.वरील सर्व कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरनात संपन्न झाले.
जळगाव जामोद मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाड्यास सुरवात...
जळगांव जा.प्रतिनिधी:-