दिनांक 28 सप्टेंबर बुधवार ला हिवरखेड येथे आदर्श शिक्षक स्वर्गीय भारतभाऊ इंगळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ भव्य नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर कार्यक्रम संपन्न झाला . दमानी नेत्र रुग्णालय अकोला ,रोटरी क्लब ऑफ बॉम्बे हँगिंग गार्डन मुंबई ,संवेदना ग्रुप अकोला यांचे संयुक्त विद्यमाने नेत्र शिबिर पार पडले. हे शिबिर डॉक्टर प्रशांत इंगळे यांच्या दवाखान्यामध्ये संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष इंगळे होते . सर्व प्रथम आदर्श शिक्षक स्व भारतजी इंगळे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 22 वर्षापासून डॉ. प्रशांत इंगळे नेत्र शिबिराचा कार्यक्रम हिवरखेड मध्ये राबवीत आहेत .प्रमुख उपस्थितीमध्ये श्रीमती नलिनीताई भारत इंगळे , भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रदीप वानखडे, वंचित बहुजन आघाडी चे इरफानअली मिरसाहेब,डॉ.बी एम कोरडे , पि. एस.आय. संदीप बलोदसाहेब, दमानी रुग्णालयाचे डॉ. केडिया डॉ. पराती, पोलीस पाटील प्रकाश गावंडे,सत्यसाई संघटनेचे शांताराम आमले, आर्की.सुशील इंगळे, सौ.संजीवनी इंगळे,अजय देशमुख, पवन सावळे ,ठाणेदार ,चंद्रकांत तिवारी, दिनकरराव भोपळे, लक्ष्मणराव हिवराळे, मिलिंद भोपळे, अशोक दारोकार, प्रकाश खोब्रागडे, शांताराम कवळकर, नेवारे मेजर विनोद भोपळे, भगवान राऊत, प्रवीण येऊल, डॉ. एम बी अग्रवाल, डॉ मानकर, डॉ तारापूरे , नंदुभाऊ शिंदपुरे, गणेश दुतोंडे, चंद्रकांत पालखडे, प्रदीप वानखडे, डॉ प्रशांत भोपळे, वासुदेव वाघ ,दिनेश इंगळे, आशिष वाकोडे यांच्या वाढदिवसानिमित्त शिबिरामध्ये वंचित बहुजन आघाडी कडून फराळ चहापाणी वाटप करण्यात आले . या वेळी 180 रुग्णांची तपासणी करण्यात आली त्या पैकी 70 रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रिये साठी पात्र ठरले. त्यांच्यावर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया दमानी रुग्णालय अकोला येथे करण्यात येईल. या शिबिरासाठी राजेंद्र लोखंडे ,वैभव गोतरकार, सुधीर ढबाले ,नितीन कोल्हे ,आर्यन इंगळे, बावस्कर यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अनिल भोपळे तर प्रास्ताविक डॉ.प्रशांत इंगळे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव कोरडे यांनी केले.
आदर्श शिक्षक स्व.भारतभाऊ इंगळे यांच्या स्मृतिपत्यार्थ भव्य नेत्र तपासणी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर संपन्न...
प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी:-