मनवेल येथील २१ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या...


 फिरोज तडवी/यावल जिल्हा जळगाव 8446936542

यावल तालुक्यातील मनवेल येथील २१ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना बुधवारी  रोजी दुपारी घडली असुन या संदर्भात पोलीस पाटील यांनी घटनेची माहिती दिल्या वरून पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.जयदीप गुलाब पाटील वय २१ वर्ष या तरुणाने दुपारी एक ते दोन वाजेच्या दरम्यान आई, वडील व भाऊ ही सर्व मंडळी शेतात कामास गेले असता आपल्या राहत्या घराच्या छताला असलेल्या लाकडी सऱ्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटनासमोर आली असुन,या तरुणाने आत्महत्या का केली हे मात्र स्पष्ट होवु शकले नाही . मरण पावलेला तरूण हा अविविवाहीत होता व मोलमजुरी करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता,त्याच्या कुटुंबात आई, वडील, एक लहान भाऊ आहे. मयत जयदीपच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले असुन, दगडी गावाचे पोलीस पाटील विठ्ठल गोरख कोळी यांनी घटनेची माहिती दिल्यावरून यावल पोलीस ठाण्यात अक्समीत मृत्युची नोंद करण्यात आली आहे .

Previous Post Next Post