बी एस पटेल महाविद्यालयाचे सहा विद्यार्थी राज्यस्तरीय पदकांचे मानकरी..


मंगल काकडे/जळगाव जा. तालुका प्रतिनिधी.

बापूमिया सिराजोद्दीन पटेल कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पिंपळगाव काळे येथील बीएससी भाग एकचे सहा विद्यार्थी खेळाडू नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय पिंच्याक सीलॅट स्पर्धेत विविध पदकांचे मानकरी ठरले.दिनांक 22 ते 24 सप्टेंबर 2022 दरम्यान नाशिक पंचवटी येथे झालेल्या पिंच्याक सीलॅट राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील खेळाडू तेजस्विनी पाखरे सुवर्णपदक व कांस्यपदक. आरती खंडागळे सुवर्णपदक.संकेत सरोदे रजतपदक.दिपाली सुरवाडे रजत पदक.प्रेरणा माघाडे कांस्यपदक. निकिता सोनवणे कांस्यपदक.अशाप्रकारे या ग्रामीण खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त केले.त्यांच्या यशाचे कौतुक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड सलीम पटेल. सहसचिव रब्बानी देशमुख,संचालक प्रा कय्युम पटेल सर , प्राचार्य डॉ आई ए राजा. उपप्राचार्य डॉ नूर मोहम्मद.डॉ चेतन पलन.खेळाडूंचे मार्गदर्शक संकेत धामंदे, स्पोर्ट डायरेक्टर डॉ बाबाराव सांगळे, डॉ ए एस काजी. डॉ शेख फराह. डॉ आनंद जाधव. प्रा प्राजक्ता बाठे. प्रा महेश नेतनास्कर.डॉ निखिल अग्रवाल. प्रा मनोहर जांभळे. प्रा नितीन असोले. यांनी केले.

Previous Post Next Post