अर्जुन खिरोडकार/हिवरखेड प्रतिनिधी...
येथील स्थानिक वार्ड क्र २ त्या काळचे इंदिरा नगर व आजच्या काळाचे गिरहे नगर म्हटले जाणारे हे नगर या नगरात सर्व धर्माचे लोकं गुण्यागोविंदाने नांदतात ,या नगरात सर्व धर्माचे विविध मंदिरे सुद्धा आहेत,अशेच एक प्रसिद्ध मंदिर श्रीमती कानुगा शाळेज त्या काळी ,लोकवर्गणीतून तेथील रहिवाशांनि १९९८ मध्यें एक रुपये हफत्यातुन नवदुर्गा मूर्तीचि स्थापना केली तर १९९९ मध्यें मंदिराच्या पंचानि लोकवर्गणीतून मंदिराचा जीर्णोद्धार केला, नंतर या मंदिरा मध्ये।दैनंदिन कार्यक्रमाना प्रारंभ झाला, रोज पहाटे तेथील भाविक हरिपाठ, आरती, भजनं, धार्मिक ,विविध कार्यक्रम घेण्यात मग्न झाले, या कार्यक्रमानि बालवयातील शालेय विद्यार्थ्यांना चांगले वळण लागायला सुरुवात झाली, नंतर महिला भाविकांनि सुद्धा या मध्ये सहभाग घेतला, या मंदिराचा जीर्णोद्धार करणारे त्या काळाचे खरे मानकरी स्व बाबूलालजि राऊत,स्व रामभाऊ येलुकार, स्व,वासूदेव चवरे, लक्ष्मण तायडे,श्रीकृष्ण घावट,सुरेश खिरोडकार, भारत येनकर, यांनी परिश्रम घेतले होते, तसेच कुसूममाई नेहमी मातांच्या मूर्तीची पूजा करायला यायची, सर्व भाविक महिला पुरूष दुर्गामाता मंदिरात दर्शनाचा लाभ घेण्यासाठी गर्दी करायचे तेव्हापासून या मंदिरात गणेश उत्सव नवरात्री उत्सव साजरे केले जातात, यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहाने येथे घटस्थापना करण्यात आली, येथील मंडळाचे कार्यकर्ते मिरणूक मध्ये सुद्धा सहभाग घेतात, अशी या मंदिराची आख्यायिका आहे,,येथे गणेश उत्सव व नवरात्री उत्सव दरवर्षी साजरा केला जातो,