जळगाव जामोद मतदार संघांमधील जळगाव जामोद तसेच वरवट बकाल ग्रामीण रुग्णालयात जळगाव मतदारसंघाचे आमदार संजय कुटे, यांच्या हस्ते नुकतेच नवीन डायलेसिस सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.त्यामध्ये प्रत्येकी ६/६ नवीन मशीन बसविण्यात आलेल्या असून ग्रामीण रुग्णालय वरवट बकाल येथे दोन वर्षांपूर्वी १०० लक्ष्य रु. किमतीचे लक्ष्य ठेवून त्या नवीन वातानुकूलित सुंदर अश्या इमारतीचे फित कापुन उद्घाटन करण्यात आले.यापूर्वी या दोन्ही तालुक्यातील बऱ्याच रुग्णांना अपुऱ्या मशीन अभावी अकोला, किंवा अमरावती, येथे महिन्यातून सहा वेळा डायलिसिस साठी जावे लागत होते. परंतु आता या तालुक्यातील रुग्णांना कोठेच जायचे काम पडणार नाही हा हे उद्दीष्ट समोर ठेऊन गेल्या २ वर्षांपासून काम चालू केले होते आणि आज ही उत्तम सेवा या दोन्ही तालुक्यात उपलब्ध करून देण्यात आली.आ.संजय कुटे ह्यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले की ,गेल्या मागील काही वर्षात आपल्या भागात भरपूर किडनीचे रुग्ण आढळून आले कित्येक लोकांचे मृत्यू सुद्धा झाले.किडनी आजार हा दूषित पाण्यामुळे होतो त्याकरिता पाण्याचे नमुने केरळच्या लॅब ला पाठवुन त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी दुषित पाणी परिक्षण सिध्द झाल्यामुळे १४० गाव पाणी योजना प्रकल्प राबिण्यात आल्याचे सांगितले. आणि या योजनेमुळे आज रोजी किडनीचे बरेच रुग्ण कमी झाले असून मृत्यू दर कमी झाला याचे खूप मोठे समाधान व्यक्त केले. तसेच जळगाव जामोद आणि वरवट बकाल या दोन्ही ग्रामीण रुग्णालयांमध्ये ८ते १५ दिवसात प्रत्येकी १/१कार्डिक ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध होईल असे आमदार डॉ. संजय कुटे यांनी सांगितले,जळगाव जामोद येथील रुग्णालयात लवकरच 100 बेडेट हॉस्पिटल ची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले,सध्या संग्रामपूर येथे चालू असलेली PHC चे तालुक्यातील पळशी येथे स्थलांतर करून संग्रामपूर येथे नवीन ग्रामीण रुग्णालय तयार होऊन अख्या महाराष्ट्रामध्ये एकाच तालुक्यात दोन ठिकाणी ग्रामीण रुग्णालय होणार अशी घोषणा त्यांनी केली.जळगाव जामोद येथे स्थापित श्रीरामजी कुटे गुरुजी ट्रस्टच्या वतीने आपल्या भागातील कुपोषित बालकांचे संगोपन करून सेवाभावी लोकांना पालकत्वाची जबाबदारी तसेच क्षयरोग रुग्णांना पोषक आहार सह घरपोच औषध वितरण लवकरच होईल .नुकत्याच झालेल्या आय कॅम्प मध्ये एकाच दिवशी 40,000 मुलांची स्क्रीनिंग करणे हा महाराष्ट्रातील एकमेव उपक्रम ठरला आहे असे त्यांनी सांगितले.यावेळी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर तरंग वारे, उपसंचालक आरोग्य सेवा, जिल्हा शल्यचिकित्सक,वैद्यकीय अधीक्षक, डॉक्टर यास्मिन चौधरी rmo बुलढाणा, माजी नगरसेवक निलेश शर्मा, डॉक्टर इक्बाल शेख, डॉक्टर किशोर केला, माजी नगराध्यक्ष जळगाव रामदास बंबटकार,अनेक डाक्टर्स,भाजप तालुका अद्यक्ष, इतर अनेक पदाधिकारी,कार्यकर्ते व असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मतदारसंघातील किडनीग्रस्त रुग्नाकरिता आ. संजय कुटे यांचा अनोखा प्रयत्न..जळगाव आणि वरवट ग्रामीण रुग्णालयात वाढीव डायलिसिस मशिन्स तसेच नवीन इमारत उद्घाटन लोकार्पण सोहळा संपन्न..
जळगांव जा. प्रतिनिधी:-