दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क शिवसेनेलाच,उच्च न्यायालयाच्या निकालाचा जळगावात शिवसैनिकाकडून फटाके फोडून जल्लोष...


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणाचा होणार याकरिता शिंदे गट आणि मूळ शिवसेना यामध्ये  रस्सीखेच चालू असताना, त्यातच मुंबई महानगरपालिकेने दोन्ही गटांना दसरा मेळावा घेण्यास परवानगी नाकारली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दसरा मेळावा घेण्यासाठी शिवाजी पार्कवर परवानगी देण्यात यावी याकरिता याचिका दाखल केली होती. आज दिनांक 23 सप्टेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे.तसेच मुंबई महानगरपालिकेने आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचंही महत्त्वाचं निरिक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. महत्त्वाचं म्हणजे, हायकोर्टाने शिंदे गटाला धक्का दिला असून सदा सरवणकर यांची हस्तक्षेप याचिका फेटाळून लावली. त्यामुळे जळगाव जामोद तालुका शिवसेना तसेच शिवसेना शहराच्या वतीने आज दिनांक 23 सप्टेंबर रोजी स्थानिक दुर्गा चौकामध्ये व तहसील चौकामध्ये फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तुकाराम काळपांडे तालुकाप्रमुख गजानन वाघ,शहर प्रमुख रमेश ताडे,तालुका उपप्रमुख मुस्ताक भाईजान, जिल्हा समन्वयक ईश्वर वाघ युवासेना तालुकाप्रमुख विशाल पाटील, भीमराव पाटील उपशहर प्रमुख मंगेश कतोरे, गजानन मोरे सुभाष माने, माजी शहर प्रमुख कैलास सोळंके माजी उपशहर प्रमुख राजेंद्र पांधी, कैलास मिसाळ, युवा सेना शहरप्रमुख गोपाळ ढगे, शाखाप्रमुख गजानन मांडेकर, युवराज देशमुख, राजनकर यांच्यासह बहुसंख्य शिवसैनिक जल्लोषासाठी उपस्थित होते.

Previous Post Next Post