धारणी तालुक्यातील बोबदो सालाई जवळ शेतात शेतकरी श्री देवराज दारशिबे वय 40 वर्षे ही शेतात काम करत असताना त्यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागेवर मृत्यू झाला या घटनेने गावावर शोकाकुल पसरली असून या बाबतची माहिती मेलघाट चे आमदार राजकुमार पटेल यांना मिळतात तत्काळ त्यांनी घटनास्थळावर भेटून कुटुंबाचे सात्वन केले सोबतच आरोग्य सेवेची ॲम्बुलन्स दाखल करून घेतली पिढीत कुटुंब हे शेतकरी असून शेतीवर त्यांचा उदरनिर्वाह आहे नैसर्गिक आपत्तीने कुटुंबाने घाला केल्याने शेतकरी कुटुंब हे दुःखात सापडलेले आहे.धारणी तालुक्यात या अगोदर सुद्धा शेतकऱ्यांचे अपघाती मृत्यू झाले असून त्यांना राजकुमार पटेल यांनी शासकीय निधीतून अनेक कुटुंबांना आधार दिलेला आहे शेतकरी दारसिम्बें यांच्या दुःखद निधनामुळे परिसरात शोककळा निर्माण झालेला आहे.घटनास्थळावर पोलीस कर्मचारी आरोग्य सेवेची ॲम्बुलन्स आमदार राजकुमार पटेल यांचे समर्थक गावकरी जमा झाले होते.या कुटुंबाला शासकीय मदत मिळावी अशी मागणी होत आहे..
धारणी जवळ बोबदो (सालाई) शेत शिवारात वीज पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी..