जीवन विकास संस्था यांचा विद्यमानाने कोयलारी येथे शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन...


राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील कोयलारी व दहेंद्री या गावात शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन जीवन विकास संस्था यांचा विद्यमानाने सुरु करण्यात आले आहे.अतिदुर्गम भागातील महिला व मुली स्वावलंबी होऊन आपल्या स्वबळावर लहान उद्योग सुरू करावे या यासाठी जीवन विकास संस्था मागील 20 वर्षा पासून आदिवासी बहुल भागात काम  करीत आहे.आदिवासी भागातील प्रत्येक खेड्यात जाऊन सामाजिक काम जीवन विकास संस्था करत आहे.जीवन विकास संस्था चुरणी,दहेंद्री,कोयलारी,कनेरी,पाचडोंगरी,गांगरखेडा,तोरणवाडी,पलस्या, दहा गावात सद्या काम जीवन विकास संस्था करत आहे.प्रकल्पाचा माध्यमातून जैविक शेती,महिला सक्षमीकरण,कुपोषण मुक्त गाव करणे तसेच किशोरी मुलींना कौशल्य विकासाचा माध्यमातून स्वावलंबी करण्यासाठी प्रकल्पाची सुरवात करण्यात आली आहे.दिनांक  ९ रोजी महिलां करीता शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्र कोयलारी येथे सुरु करण्यात आले.या कार्यक्रमाला गावातील सरपंच संजय जामुनकर,अशोक उइके उपसरपंच,भीमराव उइके ग्रामपंचायत सदस्य,राजू कवडे रोजगार सेवक,काडमा जामुनकर, वंदना उमरजरे शिवण क्लास शिक्षिका,मोनिका धुर्वे,मिना कवडे,कलाबाई मरस्कोल्हे ,आँचल पंधराम ,तनीषा मरस्कोल्हे, दिलीप धुर्वे,संतुलाल धुर्वे,अजय धुर्वे ,निलेश उमरजरे, नंदनी उमरजरे, दिपिका उइके व जीवन विकास संस्था चे तालुका कोर्डिनेटर अक्षय पारिसे सर, शिवम नितनवरे , विनोद धिकार जीवन विकास संस्था सदस्य व गावातील महिला,शेतकरी व मुली मोठया संख्येने उपस्थित होत्या.

Previous Post Next Post