जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील संतोष काळपांडे यांच्या अठरा वर्षीय कुमारी रक्षा काळपांडे हिने वडिलांच्या मालकीच्या गोठ्यातील लाकडी बल्लीला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दिनांक 23 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. सविस्तर असे की मृतक कुमारी रक्षा संतोष काळपांडे हिचे आई-वडील सकाळीच घरच्या शेतामध्ये कामाला गेले होते दुपारी शेतामधून घरी येऊन पाहतात तर मुलगी रक्षा ही घरी नव्हती आजूबाजूला बघितले असता ती मिळून आली नाही. नंतर रक्षाचे वडील संतोष काळपांडे यांनी गुरांच्या गोठ्याकडे गोठ्यात मुलीला पाहण्याकरता गेली असता त्यांना ती गळफास घेऊन लटकताना दिसली असता त्यांनी सुनील कळस्कार यांना फोनवरून घटनेची माहिती दिली असता सुनील कळस्कार यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशन गाठत त्यांनी सदर घटनेची फिर्याद दिली असता सदर मर्ग 62/2022 कलम 174 नुसार मार्ग दाखल केला यावेळी पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले हेड कॉन्स्टेबल सय्यद तैय्यब अली यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतक रक्षा हीचे शव ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे शव विच्छेदनाकरिता पाठवण्यात आले. मृतक कुमारी रक्षाही बारावी मध्ये शिकत होती असे समजले परंतु मृतक रक्षा आत्महत्या का केली त्याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. पुढील तपास ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात हेड कॉन्स्टेबल सय्यद तय्यब अली करीत आहेत.
पिंपळगाव काळे येथील अठरा वर्षीय युवतीने केली गळफास घेऊन आत्महत्या...
जळगांव जा.प्रतिनिधी:-मंगल काकडे..