सदस्य नोंदणी संदर्भात मनसेची आढाव बैठक जळगाव जामोद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणी अभियान राबविण्या करीत तसेच आगमी जिल्हा परिषद, पंचायत समिती ,नगर परिषदेच्या निवडणुकीची आढाव बैठक जिल्हा अध्यक्ष मदनराजे गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव जामोद येथे विश्रामगृह येथे दिनांक 6 सप्टेंबर रोजी पार पडली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई येथे पदाधिकारी मेळाव्यात दिलेल्या आदेशानुसार आगमी होऊ घतलेल्या निवडणूक ताकदिनिशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढणार असल्याचे आदेश दिले होते त्या संदर्भात जिल्हाध्यक्ष मदन राजे गायकवाड यांनी पदाधिकारी तथा कार्यकर्ता यांच्याशी संवाद साधला तसेच सदस्य नोंदणी करून पक्ष माननीय मजबूत करण्याबाबतचा सूचना पदाधिकाऱ्यांना दिली यावेळी उपस्थित मनसेचे तालुकाध्यक्ष राजूभाऊ राऊत शहराध्यक्ष नागेश भटकर शहर उपाध्यक्ष जगदेव डांगे,प्रमोद येऊल, योगेश म्हसाळ कुणाल तायडे गणेश कतोरे रवी चिंचोलकर सह मनसे सैनिक उपस्थित होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदस्य नोंदणी संदर्भात जळगाव जामोद येथे आढावा बैठक संपन्न...
जळगांव जा.प्रतिनिधी:-