अंजनगाव सुर्जी तालुक्यातील लखाड या गावामध्ये वर्षवास निमित्ताने सालबादाप्रमाणे बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथाचे पठण सतत तीन महिने सुरू होते. या ग्रंथाच्या समारोपीय कार्यक्रमाला आवर्जून बहुसंख्येने तालुक्यातील बऱ्याच गावातील महिला संघ व बौद्ध बांधवांनी उपस्थिती दर्शविली होती. कार्यक्रमाची सुरुवात संपूर्ण गावामधून धम्म प्रभात रॅली काढून करण्यात आली. या प्रसंगी भंतेगण व प्रमुख उपस्थिती आमदार बळवंत वानखडे, प्रमोद दाळू, राजेंद्र वाटाणे, रमेश सावळे,अरुण रायबोले, मनोज मेळे व गावाच्या प्रथम नागरिक सरपंच कांचन धम्मपाल लबडे व पोलीस पाटील राहुल सावरकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला. या पवित्र ग्रंथाचे पठण रत्नदीप जानराव आठवले यांच्या वाणितून झाले तर प्रास्ताविक सिद्धार्थ सावळे यांनी केले. या मंगल प्रसंगाचे औचित्य साधून जीवन "विकास फाउंडेशनचे "संस्थापक,अध्यक्ष राजेंद्र वाटाणे यांच्या हस्ते संपूर्ण बौद्ध उपासक,उपासीका यांना भारत देशात सर्वात श्रेष्ठ आणि पवित्र अशा मानल्या जाणाऱ्या संविधान ग्रंथाचे मोफत वाटप करण्यात आले व त्यासोबत 22 प्रतिज्ञा चार्ट,संविधान उद्देशिका, सोमेश्वर नोकरी संदर्भ पाक्षिक या विविध साहित्याचा मोफत वाटप करण्यात आला. आमदार महोदय व इतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात भोजनाचा आस्वाद घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता समाज प्रबोधनकार गायक धम्मपाल लबडे त्यांचे सहकारी व महिला उपाशीका उपासक मंडळाने परिश्रम घेतले.
लखाड येथे ग्रंथ समारोपीय कार्यक्रमानिमित्त जीवन विकास फाउंडेशन द्वारा भारतीय संविधान ग्रंथ तसेच विविध साहित्याचा मोफत वाटप...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...