पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय चुरणी येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांचा वतीने रक्तदान शिबिर संपन्न...


राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

चिखलदरा तालुक्यातील भाजपा युवा मोर्चा तर्फे भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रूग्णालय चुरणी  येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजन करण्यात आले.  या मध्ये भाजप कार्यकर्ते ,सर्वच पक्षाचे व अपक्ष पक्षाचे  कार्यकर्ते  व नागरिक यांनी रक्तदान केले.आणी विशेष म्हणजे या रक्तदान या मोहिमेला महिलांचा पण चांगला प्रतिसाद मिळाला ,महिला वर्ग यांनी पण देशाचे लाडके  पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना वाढदिवसा निमित्त रक्तदान करून वाढदिवसाच्या  हार्दिक शुभेच्छा दिल्या . असे एकूण 40 रक्तदात्यांनी रक्तदान करून या भारत देशातील ,गरोदर माता,सिकलसेल ,व गरजू व्यक्तिकरीता आपले मौल्याचे योगदान दिले. चुरणी ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी dr. धुर्वे सर यांचा पण चांगला सहयोग मिळाला . या वेळी या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रतापभाऊ अभ्यंकर, अनुसूचित जमाती जिल्हाध्यक्ष सुखदेवजी पवार,  भाजपा तालुकाध्यक्ष हिरुभाऊ हेकडे,भाजपा जेष्ठ नेते राजाभाऊ येवले,भाजयुमो जिल्हा सचिव सुमित चावरे,भाजपा तालुका महासचिव आलोक अलोकार,सागरभाऊ येवले,नरेन्द्र टाले, निखिल टाले,सौ.कमला बलराम वर्मा,सौ.सविता राजेश वर्मा,सौ.जानकी राजेंद्र येवले, नितिन वरखड़े, प्रमोद अलोकार,पराग येवले,सौरभ येवले,रवी बेठेकर,पतिराम जामुनकर,संजू साकोम, सुनील आजने, रघुनाथ अलोकार,विलास बेलकर,निलेश अलोकार,गजेंद्र येवले,श्रीराम  काकडे,जितू मुंडे,गुलशन टाले,अंकुर मालवीय,रिंकेश बेलकर,सहादेव येवले, ललित अलोकर,अमित येवले,उदय रेचे, अलकेश कास्देकर,इत्यादी लोकांनी  उपस्थिती दर्शवली.dr. सदानंदजी बर्मा ब्लड बैंक परतवाड़ा यांचा लैब द्वारे ब्लड डोनेड करण्यात आले. तर या कार्यक्रमाला यशस्वी रित्या करण्यासाठी भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चा चे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यशस्वी रित्या करण्यात आले.

Previous Post Next Post