जळगाव शहराला वृक्षारोपणातुन हिरवेगार करण्याकरिता मी आज एक वृक्ष लावला आहे तुम्ही प्रत्येक विद्यार्थी व त्यांचे कुटुंबीय यांनी प्रत्येकी एक वृक्ष लावून जळगाव जामोद शहर हिरवेगार करा व शहरातील नदीला प्रदूषणमुक्त करा असे भावनिक आवाहन केंद्रीय जल वायू व पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी दि.१९ सप्टेंबरच्या दुपारी दि. न्यू इरा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांसोबत थेट संवाद साधताना केले . केंद्रीय जल वायू व पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी दि.१९ सप्टेंबरला शहरातील दि. न्यू इरा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाला भाजप महिला मोर्चाच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधण्यासाठी आले होते . त्यांनी शालेय परिसराला भेट देऊन वृक्षारोपण केले. यावेळीआयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल जयस्वाल होते तर या कार्यक्रमाला जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय कुटे ,खामगाव मतदार संघाचे आमदार आकाश फुंडकर, गटशिक्षणाधिकारी नारायण फाळके जळगाव शिक्षण मंडळाचे संचालक तथा प्राचार्य अविनाश कुलकर्णी, संचालक अॅड शशिकांत गुप्ता, अभिजित कुलकर्णी,सौ गायत्री विप्रदास ,उपप्राचार्य शेख सलीम पर्यवेक्षक ओंकारराव तायडे व सुनील पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती . या कार्यक्रमाचे प्रास्ताविकातुन शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल जयस्वाल यांनी केंद्रीय मंत्री महोदयांना जळगाव शिक्षण मंडळ हे मागील पंच्याहत्तर वर्षांपासून या सातपुड्याच्या पायथ्याशी संस्थेचा माध्यमातून ज्ञानदानाचे कार्य अविरत करीत असल्याचे सांगून संस्थेमार्फत राबविल्या जाणारे विविध उपक्रम व संस्था यांची माहिती दिली. तसेच देशउपयोगी व राष्ट्रवादी पिढी घडवण्याचे ध्येय संस्थेने जोपासल्याचे सांगितले . केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी त्यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांसोबत सरळ संवाद साधला व त्यांना पर्यावरणाचे महत्त्व प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून सांगितले. विद्यार्थ्यांना आपण दररोज वंदे मातरम् हे गीत गातो पण त्याच गीताच्या माध्यमातून ही धरणीमाता सुजलाम सुफलाम करण्याकरिता आपण काय करावे याचे मार्गदर्शन करण्यात आले असून त्यात सांघिक करार करावा नदीमध्ये सांडपाणी सोडूनही व वृक्षारोपणातील परिसर हिरवागार करण्याचे आवाहन त्यांनी केले . या कार्यक्रमापूर्वी पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांचे भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले पर्यावरण मंत्र्यांनी त्यांच्यासोबत संवाद साधला तसेच मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक निळकंठ राठोड यांनी केले .केंद्रीय मंत्र्यांच्या प्रश्नोत्तराला विद्यार्थ्यांचा व्यापक प्रतिसाद जळगाव- केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एका शिक्षकाप्रमाणे थेट संवाद साधत पर्यावरणावर आधारित प्रश्नोत्तराचि तासिकाच घेतली . तुम्हाला वंदे मातरम् गीत इथे काय वंदे मातरम या गीतातील विविध शब्दांचा अर्थ त्यामधून दिलेला पर्यावरण संवर्धनाचा संदेश याबाबत विविध प्रश्न विद्यार्थ्यांना त्यांनी विचारले त्याला विद्यार्थ्यांनी उत्तरे देऊन व्यापक प्रतिसाद दिला . तसेच जलप्रदूषण रोखण्यासाठी शहरातील सांडपाणी सरळ नदीत न सोडण्याचा व त्याकरता सर्वांनी संकल्प करण्याबाबत मौल्यवान मार्गदर्शन मंत्रिमहोदयांनी केले . मंत्रिमहोदयांनी विद्यार्थ्यांसोबत प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून साधलेला संवाद लक्षवेधी ठरला.
जळगाव शहराला वृक्षारोपणातुन हिरवेगार व नदीला प्रदूषणमुक्त करा "-भूपेंद्र यादव केंद्रीय पर्यावरणमंत्री विद्यार्थ्यांसोबत साधला सरळ संवाद..
जळगाव जामोद प्रतिनिधी:-